पोलीसावर खुनी हल्ला करणारे आरोपीना पिस्टल , तलवारी व कोयत्यासह २४ तासांचे आत बंडगार्डन पोलिसांनी केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक ०७/०९ /२०२२ बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर .
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. (ACS NEWS) ९८२२३३१५२६
हिंदू राष्ट्रसेनेच्या तुषार हंबीर याच्यावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली . पूर्ववैमनस्य व टोळीच्या वर्चस्ववादातून हंबीर याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे .
बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर मोका गुन्हयातील आरोपी तुषार हंबीर व त्याचे संरक्षणासाठी असणारे पोलीसावर खुनी हल्ला करणारे आरोपीना पिस्टल , तलवारी व कोयत्यासह २४ तासांचे आत केली अटक पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे तुषार नामदेवराव हंबीर वय ३५ वर्षे रा . स . नं . १८ , गोंधळेनगर , हडपसर , पुणे हे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील मोक्का केस नं . ०६/२०१६ मध्ये सन २०१६ पासून येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहे ..
त्यास उपचारकामी दिनांक २५/०८/२०२२ रोजी इन्फोसीस बिल्डींग , तीसरा मजला , ससुन हॉस्पीटल , पुणे येथे अँडमीट केले होते . दिनांक ०५ /०९ /२०२२ रोजी २१:३० वा . सुमारास इन्फोसीस बिल्डींग , तीसरा मजला , ससुन हॉस्पीटल , पुणे . ठिकाणी ०५ अनोळखी इसमांनी तुषार हंबीर उपचार घेत असलेल्या वार्डामध्ये जावून आरोपीनी तलवार , कोयते , व गावठी पिस्टर घेऊन तुषार हंबीर यास जिवे ठार मारण्याचे उध्देशाने त्याचेवर कोयत्याने वार करुन पिस्टल मधुन दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला .
त्या वेळी तुषार हंबीर याचे संरक्षणा करीता नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचारी यांनी आरोपीना प्रतिबंध केल्याने आरोपी हातातील हत्यारासह पळुन गेले . नमुद वेळी आरोपीना प्रतिबंध करणारे पोलीस कर्मचारी व तुषार हंबीर याचा मेहुना शुभम रांदड हातावर वार होऊन ते जखमी झाले .. तुषार हंबीर याने दिलेल्या तक्रारी वरुन बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २४०/२०२२ भा.द.वि कलम ३०७ , ३५३ , ३३२ , १२० ( ब ) , १४९ , १४३ , १४४ , १४७ , १४८ , ९४९ आर्म अॅक्ट कलम ३ ( २५ ) , ४ ( २५ ) , क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३,७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७( १ ) ( ३ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
सदर गुन्ह्याचा तपास बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . प्रताप मानकर हे करीत आहेत . गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन मा.श्री . सागर पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०२ पुणे शहर यांनी दिलेल्या सुचना नुसार श्री . प्रताप मानकर यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे दोन पथके तयार केली . त्या नुसार तपास पथकाने ससुन हॉस्पीटल मधील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे तसेच तांत्रिक विश्लेषनाचे आधारे आरोपींचा शोध घेताना खात्रीशीर बातमी मिळाली की , आरोपी हे सध्या पानमळा सिंहगड रोड भागात असल्याने तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक राहुल पवार व त्यांचे पथकाने सापळा रचुन एकुण ०४ इसमांना दिनांक ०७ /०९ /२०२२ रोजी मध्यरात्री ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी तुषार हंबीर याचेबरोबर असलेल्या जुन्या भांडणाचे कारणावरुन त्यास जिवे ठार मारण्यासाठी हल्ला केला होता अशी कबुली दिली . त्यांना त्यांची नावे पत्ते विचारता
१ ) सागर हनुमंत ओव्हाळ वय २२ वर्षे रा . आकाशवाणी समोर , बनकर कॉलनी , स . नं . १३ , शांतीनगर झोपडपट्टी , हडपसर , पुणे . २ ) बालाजी हनुमंत ओव्हाळ वय २३ वर्षे रा . आकाशवाणी समोर , बनकर कॉलनी , स . नं . १३ , शांतीनगर झोपडपट्टी , हडपसर , पुणे . ३ ) सुरज मुक्तार शेख वय १९ वर्षे रा . हरपळे चाळ , भेकराई नगर , कुमार प्रॉपर्टी जवळ , हडपसर ,पुणे .४ ) सागर बाळासाहेब आटोळे वय २१ वर्षे रा .१० वा मैल , वडकी , लक्ष्मी वजन काट्या शेजारी , पुणे
अशी असल्याचे सांगितले असुन त्यांचा या गुन्हयामध्ये सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक ७/ ०९ / २०२२ रोजी पहाटे ०३.०० वाजता अटक करण्यात आली आहे . आरोपींचेकडे तपास करुन त्यांनी गुन्हयात वापरलेले गावठी पिस्टल , एक जिवंत काडतुस , एक तलवार , एक पालघन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . अटक करण्यात आलेले आरोपी हे पुणे शहरातील शरीरा विरुध्द गुन्हे करणारे अभिलेखा वरील गुन्हे करणारे गुन्हेगार असुन गुन्हयातील फिर्यादी संतोष हंबीर हा सुध्दा खुन , दरोडा , खुनाचा प्रयत्न , अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे करणारा अभिलेखा वरील गुन्हेगार आहे . अटक करण्यात आलेल्या आरोपीनी पुर्व वैमनस्य व गँगचे वर्चस्वा वरुन सदरचा हल्ला केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालेले आहे .
नमुद कारवाई मा . राजेंद्र डहाळे , अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग , मा . सागर पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०२ , मा . आर . एन . राजे , सपोआ लष्कर विभाग , पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि श्री . प्रताप मानकर व श्रीमती अश्विनी सातपुते , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे , तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक राहुल पवार , अंमलदार मोहन काळे , नितीन जगताप , सुधीर घोटकुले , अनिल कुसाळकर , अमोल सरडे , सागर घोरपडे , मंगेश बो – हाडे , संजय वणवे , किरण तळेकर , ज्ञाना बढे , मनोज भोकरे , सतिष मुंढे , शिवाजी सरक यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad