सात हजार स्वीकारताना वाहतूक विभागातील पोलीस कॉन्स्टेबलला यांना पुणे ,लाचलूचपत प्रतिबंधक विभाग (ACB,)ने रंगेहात पकडले.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

सात हजार स्वीकारताना वाहतूक विभागातील पोलीस कॉन्स्टेबलला यांना पुणे ,लाचलूचपत प्रतिबंधक विभाग (ACB,)ने रंगेहात पकडले.

लाचखोरीचे प्रमाण वाढत असून विविध शासकिय निमशासकीय कार्यालयात लाच घेणारे वाढत आहे, कसलीच भीती न भाळगता खाजगी पंटर नेमून लाखो, हजारो रुपये लाच स्वीकारले जाते, याबाबतीत अश्या अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करायला हवी, असे अनेक अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पगारापेक्षा जास्त इनकम बाहेरून होतो, त्याचा शोध घेऊन अथवा माहिती घेऊन चौकशी व्हावी तरच कुठेतरी भ्रष्टाचार थांबण्यास काहीतरी फरक पडेल,

नुकतीच घटना चाकण वाहतूक विभागांमध्ये घडली आहे तक्रारदार यांची मोटर सायकल वरती कारवाई न करता परत देण्यासाठी दहा हजार तडजोडे अंति सात हजार स्वीकारताना चाकण वाहतूक विभागातील पोलीस कॉन्स्टेबलला व वाहतूक नियमासाठी नेमलेला खाजगी मदतनीस यांना पुणे ,(ACB,)ने रंगेहात पकडले


आप्पासाहेब अंबादास जायभाय, वय,(३२,) पोलीस कॉन्स्टेबल चाकण वाहतूक विभाग,व वाहतूक नियमासाठी नेमलेला, किशोर भगवान चौगुले, असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल व मदतनीस, यांची नावे आहेत, ही कारवाई

दिनांक, ६/९/२०२२ रोजी वाहतूक विभाग आवारात करण्यात आली,
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात व वाहतूक विभागात खळबळ उडाली आहे,
तक्रारदार, यांची मोटरसायकल वरती कारवाई न करता परत देण्यासाठी, पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब जायभाय व वाहतूक मदतनीस किशोर चौगुले, यांनी तुमच्या गाडीवरती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी धमकी दिली व तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयाची, लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंति,७ हजार देण्याचे ठरले परंतु तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी यांची तक्रार पुणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली, विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पंचसमक्ष पडताळणी केली, पोलीस कॉन्स्टेबल व मदतनीस यांनी लाच स्वीकारल्याचे कबूल केले,

लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अधिकारी, श्रीमती शितल घोगरे, यांनी, सापळा रचून, वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल व मदतनीस यांना ७ हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले,
ही कारवाई, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे, पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली,

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *