सराईत चोरटे बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्याात घरफोडी, वाहने चोरणारी सराईत टोळी पुणे पोलीस दलाच्या बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. गुन्ह्यांची उकल, १.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

ACS POLICE CRIME SQUAD

WAJID S KHAN ACS NEWS 9822331526

WAJID S KHAN ACS NEWS

सराईत चोरटे बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्याात
४ गुन्ह्यांची उकल, १.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : घरफोडी, वाहने चोरणारी सराईत टोळी पुणे पोलीस दलाच्या बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या टोळीच्या अटकेमुळे ४ गुन्ह्यांची उकल झाली असून, तपासादरम्यान १ लाख ६१ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे २०२१ रोजी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश चं. उसगावकर, पोलीस अंमलदार अमित पुजारी, सतीश मोरे, अतुल महांगडे, तानाजी सागर, अमोल शितोळे, श्रीकांत कुलकर्णी, दीपक लोधा व राहुल कोठावळे आदी पोलीस पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना सांयकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास डॉल्फीन चौक, बिबवेवाडी येथे आलो असता पोलीस अंमलदार सतीश मोरे व तानाजी सागर यांना दोन इसम त्यांच्याकडील लाल रंगाचे पॅशन प्रो या कंपनीच्या दुचाकी वाहनावर बसून बोलत थांबल्याचे दिसले. त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपापली नावे सोहेल कादर शेख (२३, रा. शिवतेजनगर, गल्ली नंबर ०४, अप्पर बिबवेवाडी पुणे), जितेंद्र शंकर चिंधे (२७, रा. दत्तनगर जांभुळवाडी रोड, काका पवार तालीमजवळ, कात्रज, पुणे) अशी सांगितली. त्यांचेकडे असलेल्या वर नमुद पॅशन प्रो एमएच -४२-एल-८८७९ या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाबाबत चौकशी करता त्यांनी आम्हास उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. तसेच इसम सोहेल कादर शेख याचे हातामध्ये असलेल्या काळ्या रंगाची कापडीची झडती घेतली असता त्यात वेगवेगळया कंपन्यांचे मोबाईल हँडसेट, मोबाईलचे कव्हर व मोबाईलचे पार्ट दिसून आले. पोलिसांनी दुचाकी, मोबाईल हँडसेट, मोबाईलचे कव्हर व मोबाईलचे पार्ट असलेली कापडी हँडबॅग पोलीस ठाण्यात आणली. दुचाकीबाबत तपास केला असता दीड महिन्यापूर्वी सोबा सवेरा सोसायटीसमोरून चोरल्याची कबुली दिली. तसेच बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. ८२ /२०२१ भादंवि कलम ३७९, ३४, गुन्हा रजि.नं . ७६ / २०२१ भादंवि कलम ३७९, गुन्हा रजि.नं .६६ / २०२१ भादंवि कलम ४६१) असे ३ गुन्हे तर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेला (गुन्हा रजि.नंबर ४०३/२०२१ भा.दं.वि.कलम ४५४,४५७,३८०) एका गुन्हा असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी या आरोपींकडून २ दुचाकी, एक चांदीचा देवाचा हार व मुकुट, महिलेच्या पायातील चांदीच्या ४ पट्ट्या, एलजी कंपनीचा ५५ इंची एलईडी स्मार्ट टीव्ही, सोनी कंपनीचा १ डिजीटल कॅमेरा व वेगवेगळ्या कंपनीचे १६ मोबाईल असा एकूण १ लाख ६१ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यांची उकल परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश चं. उसगावकर, पोलीस अंमलदार अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, अमोल शितोळे, दीपक लोधा व राहुल कोठावळे आदी पोलीस पथकाने केली.

ACS POLICE CRIME SQUAD

WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *