हडपसर , वानवडी , कोंढवा परिसरात जबरी चोरी , ( चैनस्नॅचिंग ) जबरी चोरीचा प्रयत्न , घरफोडी , मोटारसायकल चोरी करणा – या रेकॉर्डवरिल गुन्हेगारांकडुन सोन्याचे दागिने ,

२१/०५/२०२१

दिवसाढवळया कोयत्याचा धाक दाखवून हडपसर , वानवडी , कोंढवा परिसरात जबरी चोरी , ( चैनस्नॅचिंग ) जबरी चोरीचा प्रयत्न , घरफोडी , मोटारसायकल चोरी करणा – या रेकॉर्डवरिल गुन्हेगारांकडुन कि.रु. ०४,६८,४०० / – चे सोन्याचे दागिने , महागड्या किंमतीचे मोबाईल फोन , मोटर सायकल , एल.सी.डी.टी.व्ही . इत्यादी हस्तगत करुन हडपसर पोलीसांनी आवळल्या रेकॉर्डवरिल गुन्हेगारांचे मुसक्या … हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १५/०५/२०२१ रोजी सकाळी ०६.०० च्या सुमारास मगरपट्टा सिटीमध्ये एका जेष्ठ नागरीकांची वाँकिग करतेवेळी दोन तोळयाची चैन खेचून घेवून गेल्याने जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता . सदरचा दाखल गुन्हा हा मगरपट्टा सारख्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना घडला होता . दोन्ही आरोपी हे अज्ञात होते त्यांनी लाल रंगाच्या पॅशन प्रो मोटारसायकल चा वापर केला असल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेजवरून निष्पन्न झालेले होते . सदर गुन्हयाचा तपास हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथके करीत होती . त्यानंतर दिनांक १८/०५/२०२१ रोजी सकाळी ०६.१५ च्या सुमारास पुन्हा भोसले गार्डन येथे अज्ञात तीन इसमांनी मॉर्नीग वॉक करणा – या एका महिलेला कोयता दाखवून तिच्या गळ्यातील चैन ओढून नेण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेच्या सतर्कतेमुळे त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही . त्याच दिवशी सकाळी पहाटे वानवडी पोलीस ठाणेच्या हद्दीत बी.टी.कवडे रोडवर टेम्पो चालकाला कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोची काच फोडून , ड्रायव्हरवर कोयत्याने वार करून त्याचा मोबाईल व रोख रक्कम चोरीस गेलेली होती . घटनास्थळाचे फुटेज पाहीले असता त्यामध्ये तिन इसम हे लाल रंगाच्या पॅशन प्रो मोटारसायकल वरून येवून त्यांनी गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झालेले होते . या तिन्ही गंभीर गुन्हयांचे उकल करण्याचे मोठे आवाहन हडपसर पोलीसांना होते . तसेच दोन दिवसांमध्ये झालेल्या लागोपाठ घटनांमुळे जनमानसात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते . मा.वरिष्ठांनी वरील गुन्हे उकल करून आरोपी अटक करून गेला माल हस्तगत करण्याच्या सुचना व केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे एकुण तिन पथके तयार करून घटनास्थळावरील प्राप्त फुटेज नुसार अज्ञात आरोपींचा व लाल रंगाच्या पॅशन प्रो मोटार सायकलचा शोध घेत असताना , तपास पथकाचे पोशि शाहिद शेख , पोशि शशिकांत नाळे यांना मिळालेल्या बातमीवरून वरील गुन्हयातील संशयित वर्णनाचे जबरी चोरीचे गुन्हे करणारे तिन इसम व परलेली लाल रंगाचे पॅशन प्रो मोटारसायकल वरून नविन म्हाडा , हडपसर पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली . त्याप्रमाणे सदर परिसरात तिन्ही पथके एकत्रित करून सापळा लावला असता , मिळालेल्या बातमीतील तिन्ही संशयीत इसम हे नविन म्हाडा कडे जाणा – या रोडने येताना दिसले , त्यांना तपासपथकातील अंमलदार यांनी ओळखलेनंतर त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ते न थांबता मोटारसायकल वरून भरधाव वेगाने जात असता पथकातील अंमलदारांने त्यांचा पाठलाग करून त्यांना न्यू इंग्लिश स्कुलजवळ पकडले असता त्यांचेकडे विचारपूस करून त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १ ) अभिजीत ऊर्फ दादया अशोक रणदीवे वय २१ वर्ष रा . म्हाडा कॉलनी हडपसर पुणे . २ ) सतीश आण्णाजी केदळे वय ३२ वर्ष रा . म्हाडा कॉलनी हडपसर पुणे . असे सांगून त्यांचे सोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक देखील मिळून आला त्यानंतर वरील तिन्ही संशयिताना हडपसर पोलीस ठाणे येथे घेवून जावून त्यांना विश्वासात घेवून अधिक तपास केला असता त्यांनी त्यांचा साथीदार ( ३ ) नोएल ऐलेन शबान वय २० वर्ष रा . कोरेगाव पार्क , सर्कीट हाऊस जवळील ब्रिजखाली बंडगार्डन पुणे . यांचेसह हडपसर , वानवडी , कोंढवा , कोरेगाव पार्क , पोलीस ठाणेच्या हद्दीत पहाटेच्या वेळेस रस्त्याने जाणारे टेम्पो चालक , ट्रक ड्रायव्हर , मॉर्नीग वॉक करीता जाणारे इसम यांना कोयत्याचा धाक दाखवून
तसेच काहींना जखमी करून त्यांचेकडून मोबाईल फोन , रोख रक्कम , असे जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याचे कबूली दिली . तसेच त्यांनी हडपसर पोलीस ठाणे हद्दीत जुना म्हाडा येथे दोन ठिकाणी घरफोड्या केल्या असल्याची देखील कबूली दिलेली आहे . तसेच वरील तिन्ही आरोपींकडून महागड्या किंमतीचे एकुण २४ चोरीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून त्याबाबत अधिक तपास चालू आहे . वरील चारही संशयितांकडून तपासा दरम्यान खालील गुन्हे उघड झाले आहेत १. हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३६५/२०२१ भा.दं.वि.कलम ३ ९ २,३४ २. हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३७३/२०२१ भा.दं.वि.कलम ३ ९ ३.३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ ३. हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३६८/२०२१ भा.दं.वि.क ४५४,४५७,३८० ४. हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३७७/२०२१ भा.दं.वि.क ४५४,४५७.३८० ५. वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं १६६/२०२१ भा.दं.वि.कलम ३ ९ ४,३४१,४२७,५०४,५०६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५ ६. कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं ३७५/२०२१ भा.दं.वि.कलम ३ ९ २,३४१,३४ ७. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन १०२/२०२१ भा.दं.वि.कलम ३७ ९ नमुद आरोपींकडून वरिल गुन्ह्यातील ०४,६८,४०० / – कि.रु.चे त्यामध्ये सोन्याचे दागिने , महागड्या किंमतीचे मोबाईल फोन , मोटर सायकल , एल.सी.डी.टी.व्ही . इत्यादी हस्तगत करण्यात आलेला आहे . वरील गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे करीत आहेत . आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर वेगवेगळया पोलीस ठाणेमध्ये मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत . सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , श्री . बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , श्री . राजु अडागळे , पोनि . ( गुन्हे ) श्री . दिगबर शिंदे पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , पोलीस शिपाई शाहीद शेख , अकबर शेख , शशिकांत नाळे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे . ( राजु अडागळे ) पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) . हडपसर पोलीस स्टेशन पुणे
नमुद आरोपी हे पोलीसांच्या रेकॉर्डवरिल गुन्हेगार असून त्यांचे विरूध्द दाखल असलेले गुन्हे पुढीलप्रमाणे .. आरोपी अभिजीत ऊर्फ दादा अशोक रणदीवे याचे विरूध्द दाखल असलेले गुन्हे १. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १०० / २०१९ भादंविक ३७ ९ २. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ११६ / २०१ ९ भादंविक ४५४,४५७,३८० ३. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ६८ ९ / २०१९ भादंविक ३७ ९ ४. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ९ ६० / २०२० भादंविक ३७ ९ ५. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १२० ९ / २०२० भादंविक ३७ ९ ६. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १३० ९ / २०२० भादंविक ३ ९ २ ७. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १३११/२०२० भादंविक ४५४,४५७,३८०,५११ आरोपी नोएल ऐलेन शबान याचे विरूध्द दाखल असलेले गुन्हे १. बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १२६ / २०१ ९ भादंविक ३७ ९ २. पुणे रेल्वे स्टेशन , गु.र नं २ ९ १ / २०१ ९ भादंविक ३०२,२०१ ३. बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १२७ / २०१ ९ भादंविक ३७ ९ ४. जीआरपी पुणे गु.र.नं १४७७ / २०१ ९ भा.दं.वि.क ३७ ९ ५. जीआरपी पुणे गु.र.नं १०१७/२०१८ भा.दं.वि.क ३७ ९ , ५०६,४११ ६. येरवडा पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ६२ / २०१ ९ भा.दं.वि.क ३७ ९ ७. खडकी पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ६२ / २०१ ९ भा.दं.वि.क ३७ ९

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *