अलंकार पोलीस ठाण्याच्या धाडसामुळे शिक्षकाचा जीव वाचला!apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
अजूनही माणुसकी जिवंत आहे! कोथरूड, ता. २५ : नैराश्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाला अलंकार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी वाचवले.
दिनांक 24/08/2025 रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजता सुजय जोशी (वय 39, व्यवसाय – शिक्षक, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी राजाराम ब्रिजवरून नदीत उडी घेतल्याची माहिती कंट्रोल रूम 112 वरून प्राप्त झाली.दरम्यान, अलंकार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या शिक्षकाला शिताफीने वाचवले.
ही घटना वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असली तरी अत्यंत महत्त्वाचा कॉल असल्याने अलंकार पोलीस स्टेशनचे शूर पोलिस कर्मचारी –पो.शी. 9694 किरण केंगल,पो.शी. 6340 प्रज्वल बोरकर,पो.शी. 10686 आशिष राठोड,हे घटनास्थळी तात्काळ धावून गेले व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारून त्या व्यक्तीचा जीव वाचवला.

यानंतर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुजय जोशी यांच्या आई स्मिता जोशी यांना अलंकार पोलीस ठाण्यात बोलावून मुलाला सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
या कार्यात अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने तसेच सर्व शूर कर्मचारी यांचे कार्य कौतुकास्पद आहे.अशा घटनांमधून खऱ्या अर्थाने पोलीस दलातील माणुसकी व तत्परता अधोरेखित होते.

या घटनेमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत असून, योग्य वेळी केलेल्या धाडसामुळे एक अमूल्य जीव वाचवण्यात यश आले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
