ACBBreaking NewsCrime NewsPMC NewsPolice NewsTraffice Police

फरासखाना वाहतूक विभागातील पोलिसांचे जीवावर उदार होऊन पीएमटी बसचालकाचा जीव वाचविण्यात यश,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फरासखाना वाहतूक विभागातील पोलिसांचे जीवावर उदार होऊन पीएमटी बसचालकाचा जीव वाचविण्यात यश,

पुणे शहरात आज एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रोड, कसबा पेठ येथे ड्युटीवर असलेल्या फरासखाना वाहतूक विभागातील पोलिसांनी वेळीच धाव घेऊन एका बसचालकाचा जीव वाचविला.
आज दिनांक २५/०८/२०२५ रोजी पोलिस कॉन्स्टेबल १६९६ रमेश भारवे व महिला पोलिस कॉन्स्टेबल १०२९ अर्चना निमगिरे हे वाहतूक नियमनाचे काम पाहत असताना लक्ष्मी रोडवरील एमएच-१२-क्यूजी-२०६७ ही सिटी बस थांबली. त्या वेळी बसचालक अनिल दत्तात्रय झगडे (वय ४२) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते गाडी चालवताना बेशुद्धावस्थेत कोसळले.

बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. त्यावेळी पोलिस कर्मचारी रमेश भारवे व अर्चना निमगिरे यांनी धाडस दाखवत तत्काळ बस थांबवली व चालकाला बाहेर काढले. भारवे यांनी तात्काळ सीपीआर देऊन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर चालकाला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.पोलिस अधिक्षक श्री. संजय गायकवाड व पोलीस उप अधिक्षक श्री. राजेश अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे चालकाचा जीव वाचला आहे.

पुणेकर नागरिकांकडून पोलिस दलाच्या या कार्याचे कौतुक होत आहे. वेळीच दाखवलेल्या शौर्यामुळे आज एका कुटुंबाचा आधार वाचवण्यात आला.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *