Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार देशी पिस्टल व काडतुसांसह आरोपीला केली अटक,दत्तवाडी पोलीस ठाणेचे तपास पथक ची कामगिरी.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक २१/०२/२०२३ (ACS NEWS)

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

दत्तवाडी पो.स्टे. पोलीस अंमलदार, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले व अमित सुर्वे. यांची कामगिरी , रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ला केली अटक.

दत्तवाडी पोलीस ठाणेचे तपास पथक.ची कामगिरी पेट्रोलिंग करत असताना आरोपीला केली अटक.गंभीर अपराध सराईत गुन्हेगार देशी पिस्टल व काडतुसांसह जेरबंद.

कसबा विधानसभा पोट निवडणुकीचे अनुषंगाने वरिष्ठांचे सुचनांनुसार पुणे शहरातील अवैद्य हत्यारे,अग्नीशस्त्रे बाळगणा-यांवर सक्त कारवाई करण्याच्या आदेशांनुसार दि.२०/०२/२०२३ रोजी दत्तवाडी पोलीस ठाणेचे तपास पथक दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले व अमित सुर्वे यांना त्यांच्या खास बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, “दत्तवाडी पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गणेश महामुनी हा मांगीरबाबा चौक, दांडेकर पुला जवळ, पुणे येथे थांबला असुन त्याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल असुन तो मांगीर बाबा चौक दांडेकर पुल, पुणे येथे संशयास्पदरित्या काहीतरी गंभीर अपराध करण्यासाठी थांबलेला आहे.” अशी खात्रीशीर बातमी मिळाली..

सदर बाबतमीचे अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक अभय महाजन व पोलीस निरिक्षक, (गुन्हे), विजय खोमणे यांना कळवुन त्यांचे आदेशाने पोलीस उप-निरिक्षक चंद्रकांत कामठे यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जावुन स्टाफचे मदतीने सापळा रचुन गणेश नंदकुमार महामुनी, वय २८ वर्षे, रा. सर्व्हे नं. १३०, रामकृष्ण मठासमोर दांडेकर पुल, सिंहगड रोड, पुणे सद्या रा.गल्ली नं. ९१, जनता वसाहत, पुणे यास ताब्यात घेवुन,त्याच्या अंगझडती मध्ये त्यांचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे असे एकुण ४०,५००/- रुपये किमंतीचे अग्नीशस्त्र मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. त्याचेविरुध्द प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. राजेद्र डाहाळे, पोलीस उप-आयुक्त, परि. ०३, श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग, श्री. राजेंद्र गलांडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरिक्षक (गुन्हे), विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक, चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, किशोर वळे, अमोल दबडे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, अनिस तांबोळी व ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *