दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कामगिरी पेट्रोलिंग करीत असताना वाहनचोरी करणारे २ आरोपीला केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कामगिरी पेट्रोलिंग करीत असताना वाहनचोरी करणारे २ आरोपीला केली अटक.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा , पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे दरोडा, वाहनचोरी, जबरी चोरी, पाहिजे व तडीपार आरोपी यांचे वर प्रतिबंधक कारवाईचे अनुषंगाने हडपसर पो.स्टे. हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल इंगळे व विक्रांत सासवडकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की श्री लक्ष्मी इन्कलेव्ह सोसायटी गेटजवळ जुन्या केनॉल शेजारील रोडवर माळवाडी हडपसर पुणे येथे नंबर प्लेट नसलेला मोटर सायकलवर दोन मुले आपसामध्ये बोलत थांबलेले आहे, त्यांच्याकडे असलेली गाडी चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने
लागलीच सदरची बातमी पथकाचे प्रमुख सुनिल पंधरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक ) यांना कळविले असता त्यांनी सदर बाबत कारवाई करणे कामी योग्य त्या सूचना दिल्याने सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने सापळा रचून सदर संशयीत मुलाना अत्यंत शिताफीने पकडले असता त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव 1) सत्यम नामदेव काळे ,वय २१ वर्ष रा. पुनावाला डेअरी समोर गोडबोले वस्ती मांजरी पुणे व मुळगाव मु पो पांधरी खुर्द ता. मंठा जि. जालना. २) स्वागत अप्पा मांढरे वय १९ वर्ष रा. लोणकर वस्ती केशवनगर मुंढवा पुणे मूळ गाव आंबेडकर नगर बारामती रेल्वे स्टेशन जवळ बारामती जि. पुणे.
असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन दरोङा विरोधी पथकाचे कार्यालयात आणुन अधिक चौकशीत त्याचे ताब्यातील HONDA कंपनीची शाईन गाडीचे मालकी व कागदपत्र बाबत चौकशी केली करता त्यांनी काहीही उपयुक्त व समाधान-कारक माहिती न दिल्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्या कडे असलेली HONDA शाईन बाबत हडपसर पो स्टे येथे गु र नं 309/2023 भादवि 379 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले. तसेच त्यांच्या अंगझडती मध्ये त्यांच्या कडे 3 मोबाईल मिळून आल्याने त्यांच्या कडे अधिक चौकशी केली असता आणखी 9 दुचाकी चोरी केल्याचे व 3 मोबाइल हिसकावून आणलेले तपासात निष्पन्न झाले असुन त्यांच्या कडील 3 मोबाईल व 9 मोटार सायकली पंचनाम्याने जप्त केल्या आहेत. आरोपीकडून खालील प्रमाणे एकूण 12 गुन्हे उघडकीस आलेले असून एकूण रु. 2,52,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे
1) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 315/2023, कलम 392, 34
2)चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 81/2023, कलम 392,34
3) चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 83/2023, कलम 392, 34
4) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1211/2022, कलम 379, 34
5)हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1450/2022, कलम 379, 34
6)हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 312/2023, कलम 379, 34
7)हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 302/2023, कलम 379, 34
8)हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 309/2023, कलम 379, 34
9)लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 674/2022, कलम 379, 34
10)लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 654/2022, कलम 379, 34
11)बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 64/2023, कलम 379, 34
12)कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 134/2023, कलम 379, 34
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकामी हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सो , मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शना खाली सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी पोलीस अंमलदार राजेश अभंगे, दत्तात्रय खरपुढे, विनायक रामाने, सुदेश सपकाळ, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, संदीप येळे, विनायक येवले, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.
सुनील पंधरकर पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad