खुनाच्या प्रयत्नातील दोन महीन्यांपासुन फरार असलेल्या आरोपींना खडक पोलीसांनी केले जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

खडक पोलीस स्टेशनची कामगिरी

खडक : खुनाच्या प्रयत्नातील दोन महीन्यांपासून फरार असलेल्या आरोपींना खडक पोलीसांनी केले जेरबंद.

पुणे, दि. ११ नोव्हेंबर.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

यातील फिर्यादी हे दिनांक १० / ०९ / २०२२ रोजी रात्री ०२.३० वा दत्त मंदिराजवळ , काशीवाडी , भवानीपेठ , पुणे येथे गणेश विसर्जनाची मिरवणुक पाहुन घरी जात असतांना एकास आरोपी सिध्दार्थ संजय कांबळे, अदनान मुश्ताक बागवान, नझीर सलीम शेख, आसिफ बाबुलाल शेख यांनी एकत्र मिळून जुन्या कारणाचे वादावरुन फिर्यादीस कु-हाडीने व लाथाबुक्कयांनी मारहाण केल्याने खडक पोलीस ठाण्यात गुन्हा रजि . क्र . २७१/२०२२ भादवि कलम ३०७,३२३,५०६,३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ ) , महा . पो . कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद आहे .

वरीलप्रमाणे दाखल गुन्हयातील दोन आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आले होते. यातील दोन आरोपी १ ) सिध्दार्थ संजय कांबळे, वय २२ वर्ष रा. महाराष्ट्र तरुण मित्र मंडळाजवळ ६११, कासेवाडी भवानी पेठ, पुणे २) अदनान मुश्ताक बागवान वय २१ वर्ष रा. दिपज्योत तरुण मंडळ, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे हे गुन्हा दाखल झाल्या दिनांका पासुन अटक चुकविण्यासाठी फरार होते. नमुद पाहीजे आरोपीबाबत शोध व तपास चालू असताना आरोपी सिध्दार्थ संजय कांबळे हा गगणदिप अपार्टमेंट आंबेगाव बुद्रुक धनकवडी पुणे येथे आला असल्याबाबत पोलीस अंमलदार संदिप तळेकर व सागर घाडगे यांना बातमीदारा मार्फत खात्रिशीर माहीती मिळाली. मिळालेल्या माहीतीच्या अनुषंगाने श्रीमती संगीता यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे व श्री राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आली. आरोपी सिध्दार्थ कांबळे यास आंबेगाव बुद्रुक धनकवडी पुणे येथुन सापळा रचुन शिताफिने पकडण्यात आले आहे. तसेच आरोपी अदनान मुश्ताक बागवान हा न्यु ग्रेस इंग्लिश स्कुलजवळ कोंढवा पुणे येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यास सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले आहे. अशा प्रकारे दोन महीन्यांपासुन पोलीसांची अटक चुकविणा-या दोन्ही आरोपींना सदर गुन्हयामध्ये दिनांक ११/११/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे.

नमुद कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे राजेंद्र डहाळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, पुणे (अतिरिक्त पदभार) श्री. आर. राजा, व सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन श्रीमती संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे, सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप निरीक्षक अतुल बनकर, व पोलीस अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, सागर घाडगे, विशाल जाधव, नितीन जाधव, लखन ढावरे, रफिक नदाफ, अक्षयकुमार वाबळे, महेश पवार, महेश जाधव, तेजस पांडे यांचे पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *