फरासखाना पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर यांची कामगिरी यांनी शिताफीने पाठलाग करुन आरोपी ला केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक ०३/०८/२०२२ फरासखाना पोलीस स्टेशन , पुणे शहर

पिस्तुल बाळगणा – या सराईत व पाहीजे आरोपीस फरासखाना पोलीसांकडुन अटक .

दिनांक ०३/०८/२०२२ रोजी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशनडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत पायी पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदार करवी माहीती मिळाली की , दगडीनागोबा मंदीर गणेश पेठ , पुणे येथे एक इसम पिस्तुल घेऊन थांबलेला आहे अशी माहीती मिळाली .

सदरची माहीती तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी यांना सांगितली असता त्यानी सदर बाबत माहीती मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र लांडगे व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) शब्बीर सय्यद यांना सांगितली असता त्यांनी खात्री करुन कारावाई करण्याचे तोंडी आदेश दिल्याने सदर ठिकाणी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी , पोलीस अंमलदार यांच्यासह जावुन बातमी प्रमाणे खात्री करत असताना सदरचा इसम पळुन जाऊ लागला .

तेव्हा पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर यांनी शिताफीने पाठलाग करुन तात्काळ पकडले . त्यावेळी त्याचेकडे चौकशी करता त्याने त्याचे नाव ऋषीकेश सुनिल बागुल , वय २४ वर्षे , रा.एस.आर.ए. बिल्डींग , शिंदे वस्ती हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले . तेव्हा त्याची झडती घेता त्याच्या जवळ देशी बनावटीचे पिस्तुल व २ जिवंत काडतुसे मिळुन आल्याने ती जप्त करण्यात आली आहेत .

( याच्याविरुध्द १ ) मुंढवा पोलीस स्टेशन ( २ ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.( ३ ) फरासखाना पोलीस स्टेशन गु.( ४ ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.( ५ ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.( ६ ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु ( ७ ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन ( ८ ) हडपसर पोलीस स्टेशन गु.( ९ ) फरासखाना पोलीस स्टेशन गु.प्रमाणे गुन्हे दाखल असुन तो फरासखाना पोलीस स्टेशन गुरजि . नं १३० / २०२२ व हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि . नं ८ ९ / २०२२ मध्ये फरार होता .

ऋषीकेश बागुल यांच्या विरुध्द पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक , निलेश मोकाशी हे करत आहेत .

सदरची कारवाई मा . पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अभिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री . संदीप कर्णिक , मा . अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर , श्री राजेंद्रडहाळे , मा . पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे डॉ . प्रियंका नारनवरे , मा . सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री . सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . राजेंद्र लांडगे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री . शब्बीर सय्यद , पोलीस उपनिरीक्षक , निलेश मोकाशी , पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर , रिजवान जिनेडी , मेहबुब मोकाशी , प्रविण पासलकर , वैभव स्वामी , मोहन दळवी , महावीर वल्टे , संदीप कांबळे , राकेश क्षीरसागर , समीर माळवदकर , किशोर शिंदे , गणेश आटोळे , सुमित खुट्टे , पंकज देशमुख , तुषार खडके , अजित शिंदे , शशिकांत ननावरे यांच्या पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *