महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायद्यानुसार कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

कोंढवा पोलीस स्टेशनची कामगिरी.

व्याजाचे पैसे परत दिले नाही म्हणून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी कोंढव्यातील ” शेरखान पठाण ” यांना अटक .

महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायद्यानुसार कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल .

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. (ACS NEWS ) प्रतिनिधी

व्याजाचे पैसे परत दिले नाही म्हणून एका ४० वर्षाच्या महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी कोंढव्यातील शेरखान चांदखान पठाण ७७ रा . शेरखान चाळ , ग्रीन पार्क कोंढवा पुणे यांच्या सहित ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे .

हकीकत अशी की फिर्यादी महिलेला पैशाची गरज असलेने शेरखान यांच्याकडून मे २०२१ मध्ये प्रति महिना २० टक्के व्याजदराने २० हजार देवुन आज पावेतो व्याजाचे २० टक्के दराने एकुण ५८ हजार ४०० रुपये व्याज परत घेतले , असुन मुद्दलाचे मोबदल्यात फिर्यादी कडुन मथुरा पतसंस्था सोलापुर यांचा एक कोरा चेक घेवुन व्याजाचे पैसे मुदतीत न दिल्याने फिर्यादीस शेरखान याने त्याचे ऑफिसवर बोलावुन व्याजाचे पैसे मुदतीमध्ये का देत नाही असे म्हणुन शिवीगाळ करुन धमकी दिली आहे . संबंधितांविरुद्ध भादविक ५०६ , ५०४,३४ सह महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायदा कलम ३९ ,४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *