Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

खडक पोलीस स्टेशनची कामगिरी,11लाख 50 हजार रूपये चोरणारा सराईत गुन्हेगार ला केले अटक ! खडक पोलिसांकडून 500 CCTV कॅमेऱ्यातील फुटेजची तपासणी,apcs in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिकीतून 11 लाख 50 हजार रूपये चोरणारा सराईत अटकेत ! खडक पोलिसांकडून 500 CCTV कॅमेऱ्यातील फुटेजची तपासणी,

पुणे : व्यापाऱ्यावर पाळत ठेवून तो व्यापारी टिंबर मार्केट येथे गेल्यानंतर त्याच्या पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतील 11 लाख 50 हजार रूपये लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज डोळयात तेल घालून पाहिल्यानंतर चोरटयाचा पर्दाफाश झाला असून अखेर त्याला बोपखेल फाटा येथून अटक करण्यात आली आहे.

रामकेवल राजुकुमार सरोज उर्फ राकेश प्रदीपसिंग रजपुत (46, सध्या रा. ज्ञानदा सोसायटी, चाकण, पुणे. मुळ रा. पौथीपुर, कधईपुर, सुलतानपुर, लंभुआ, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी रामकेवल याच्याविरूध्द पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यात 30 गुन्हे दाखल आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 2 फेब्रुवारी 2024 रोजी महेश शिवाजी नाळे (35, रा. निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर) हे टिंबर मार्केट येथे कामानिमित्त गेले होते. आरोपीने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. नाळे हे त्यांची दुचाकी पार्क करून कामासाठी गेले असताना आरोपीने त्यांच्या डिक्कीतील 11 लाख 50 हजार रूपये लंपास केले. याबाबत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टिंबर मार्केट सारख्या व्यापारीक्षेत्रामधून भरदिवसा चोरी झाल्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी तपास पथकातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुन्हयाच्या तात्काळ तपासाबाबत आदेश दिले. पोलिसांनी परिसरातील आणि येण्या-जाण्याच्या रस्त्यावरील तब्बल 500 सीसीटीव्ही फुटेज डोळयात तेल घालून तपासले. त्यामध्ये एकजण संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याची माहिती काढण्यास सुरूवात केली असता तो बोपखेल फाटा येथे असल्याचे पोलिसांना समजले. खडक पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त प्रविण पवार, अप्पर आयुक्त प्रविण पाटील, पोलिस उपायुक्त संदिपसिंह गिल, सहाय्यक आयुक्त रूक्मीणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविंद्र गायकवाड, पीआय (गुन्हे) संपतराव राऊत, तपास पथकाचे एपीआय राकेश जाधव, पोलिस अंमलदार संदिप तळेकर, किरण ठवरे, हर्षल दुडम, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, लखन ढावरे, प्रशांत बडदे, रफिक नदाफ आणि आशिष चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *