बिल्डरला लाच मागणारा महावितरण कार्यालयातील तंत्रज्ञ अॅन्टी करप्शन च्या जाळ्यात,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
दि.१४/०२/२०२४:- ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
बिल्डरला लाच मागणारा सेनापती बापट येथील महावितरण कार्यालयातील तंत्रज्ञ अॅन्टी करप्शन च्या जाळ्यात,
पुण्यातील एका बांधकाम व्यवसायिकाकडून 24 हजार रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेनापती बापट रस्त्यावरील प्रकाश भवन महावितरण कार्यालयातील तंत्रज्ञ योगेश गोकुळ पाटील यांच्याविरूध्द चतुःश्रंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे बिल्डर असून त्यांनी करून दिलेल्या वास्तु नुतनीकरण इमारतीमध्ये वीज मीटर कमी पडत असल्याने त्याठिकाणी नवीन 4 वीज मीटर कनेक्शन घेणेकरता व नवीन वीज मीटर जोडणीसाठी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. योगेश पाटील यांनी तक्रारदार बिल्डर यांच्याकडे नवीन कनेक्शन आणि स्थळ पाहणी अहवालात त्रुटी न ठेवण्यासाठी प्रत्येक मीटर कनेक्शनमागे 6 हजार रूपये असे एकुण 4 मीटरसाठी 24 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली.लाच देण्याची इच्छा नसल्याने बिल्डरने अॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता पंचासमक्ष योगेश पाटील यांनी 24 हजार रूपायाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर योगेश पाटील यांच्याविरूध्द अॅन्टी करप्शनने गुन्हा दाखल केला आहे.
पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण करीत आहेत.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in