समर्थ पोलीस स्टेशनची कामगिरी, तडीपार आरोपीकडुन चोरीचे गुन्हे उघडकीस लाखोचा मुद्देमाल जप्त,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

तडीपार आरोपीकडुन चोरीचे गुन्हे उघडकीस लाखोचा मुद्देमाल जप्त,

तडीपार आरोपी निखील उर्फ दादा कांबळे समर्थ पोलीस स्टेशन सपोनि लोणारे, पोलीस अंमलदार श्याम सूर्यवंशी, हेमंत पेरणे, रहीम शेख यास ताब्यात घेतले.

दिनांक – ०५/०२/२०२३

समर्थ पोलीस स्टेशनची कामगिरी, तडीपार आरोपीकडुन चोरीचे गुन्हे उघडकीस लाखोचा मुद्देमाल जप्त,

या इसमास पत्ता विचारण्याच्या बहाणा करुन व नंतर माझे चुकले तुमच्या पाया पडतो असे म्हणुन पाया पडण्याचे नाटक करुन चोरी करणाऱ्या तडीपार आरोपीला समर्थ पोलिसांनी केली, अटक केली.निखील उर्फ दादा शशिकांत कांबळे वय २२ रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर असे तडीपार आरोपीचे नाव आहे,

समर्थ पोलीस स्टेशनकडील सपोनि प्रसाद लोणारे व त्यांचे पथक हददीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहीजे आरोपी व तडीपार आरोपी चेक करीत होते. दिनांक १८/०१/२३ रोजी पत्ता विचारण्याच्या बहाणा करुन व पाया पडण्याचे नाटक करुन खिशातील रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली होती.

त्याअनुषंगाने पोलीस अंमलदार श्याम सुर्यवंशी यांनी हददीतील सीसीटीव्ही चेक केले असता फुटेज मध्ये हडपसर पोस्टे कडील तडीपार आरोपी निखील उर्फ दादा शशिकांत कांबळे वय २२ रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर हा निष्पन्न झाला. दिनांक ०२/०२/२३ रोजी सदर आरोपीबाबत गोपनिय माहीती मिळाली की, तडीपार आरोपी निखील उर्फ दादा शशिकांत कांबळे हा समर्थ पोलीस स्टेशनच्या हददीत आलेला आहे. सदरची माहीती समर्थ पोस्टेचे रमेश साठे यांनी माहीती दिली असता त्यांनी तात्काळ सदर इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले.

सदर आरोपींची माहीती घेवुन सपोनि लोणारे, पोलीस अंमलदार श्याम सूर्यवंशी, हेमंत पेरणे, रहीम शेख यांनी सापळा रचुन तडीपार आरोपी निखील उर्फ दादा कांबळे यास ताब्यात घेतले. सदरचा आरोपी हा पुणे शहरातुन दोन वर्षाकरीता तडीपार केलेला असतांना सुध्दा पुणे शहरात येवुन गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले, त्याचेवर १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपी याचेकडे गुन्हा करण्याच्या पध्दतीबाबत सखोल चौकशी केली असता आरोपी हा एखादा इसम पायी जात असतांना त्याची रेकी करीत होता व नंतर मो.सा वरुन येवुन पायी जाणा-या इसमास पत्ता विचारण्याच्या बहाणा करुन व नंतर माझे चुकले तुमच्या पाया पडतो असे म्हणुन पाया पडण्याचे नाटक करुन पायासोबत झटापट करुन खिशातील पैसे नकळत काढुन घेत होता. सदर आरोपी याने चोरी ही करण्याची नविन युक्ती शोधली होती.

याबाबत समर्थ पोस्टे येथे गुन्हा नोंद झालेला होता सदर गुन्हयाचे अनुषंगाने सपोनि लोणारे यांनी आणखी तपास केला असता त्याने समर्थ पोलीस स्टेशनच्या हददीतुन एक टेम्पो व विश्रामबाग पो स्टे च्या हददीतुन एक रिक्षा सुध्दा चोरल्याचे सांगीतले. आरोपीकडुन एकुण ३ गुन्हे उघडकीस आलेले असुन त्याचेकडुन एक टेम्पो व एक रिक्षा असा एकुण साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली समर्थ पो.स्टे, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश साठे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रमोद वाघमारे, यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार श्याम सूर्यवंशी, हेमंत पेरणे, रहिम शेख दत्तात्रय भोसले, अर्जुन कुडाळकर, जितेंद्र पवार, सुभाष पिंगळे, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास वाघीरे कल्याण बोराड, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, बर्डे यांनी केली आहे…

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *