Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

दुचाकी चोरी करणाऱ्या दोघे वाकड पोलिसांनच्या जाळ्यात; आरोपींकडुन चोरीचे एकुण २२ गुन्हे उघड करुन किं.रु. १५,४०,०००/- च्या २२ मोटार सायकली जप्त.वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पिंपरी चिंचवड,दि.१५ :-(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

दुचाकी चोरी करणाऱ्या दोघे वाकड पोलिसांनच्या जाळ्यात; आरोपींकडुन चोरीचे एकुण २२ गुन्हे उघड करुन किं.रु. १५,४०,०००/- च्या २२ मोटार सायकली जप्त.वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात मोटार सायकल चोरी मध्ये मोठया प्रमाणात वाढ झालेने मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त पोलीस अंमलदार नेमुन सतर्क पेट्रोलींग, सक्त नाकाबंदी, वाहन चोरी करणारे आरोपींची माहीती काढुन आरोपी अटक करुन वाहन चोरींना आळा घालणेबाबत आदेश दिले आहेत.

दुचाकी चोरणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या  १५ लाख ४० हजारांच्या २२ दुचाकी वाकड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ओंकार दिलीप गवारे व महेश महादेव दनाने अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचं देखील समोर आले आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून शहरात पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरी करणारे आरोपी हे थेरगाव येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. व सापळा रचून वाकड पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी २२ गुन्हे केल्याचं कबूल केले. आरोपीकडून १५ लाख ४० हजारांच्या एकूण २२ दुचाकी वाकड पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

नागरीकांना याद्वारे आवाहन करणेत येत आहे की, कोणीही व्यक्ती आपणास स्वस्त दरामध्ये विना कागदपत्रांची मोटार सायकली विक्री करीत असेल तर सदरचे मोटार सायकली विकत न घेता सदरचे व्यक्तीची माहीती तात्काळ जवळचे पोलीस स्टेशनला दयावी. जर आपण चोरीचे वाहन विकत घेतले तर आपण चोरीची मालमत्ता विकत घेतली यासदराखाली आरोपी होवु शकता.


सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे साो, सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी साो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे साो, पोलीस उप आयुक्त, परि २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. विशाल हिरे साो, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोविभीषण कन्हेरकर, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफो राजेंद्र काळे, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा.प्रमोद कदम, पोहवा संतोष बर्गे, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना.राम तळपे, पोशि अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि. कीर्तेय खराडे, पोशि. भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि. सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *