औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे कर संकलन विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ठिकाण :- दिनांक ११/०६/२०२४ रोजी सायंकाळी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे पार्कीगमध्ये, औंध, पुणे..पुणे महानगरपालिकेच्या औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, कर संकलन विभागातील दोन लिपीक टंकलेखकांवर लाच मागणी व स्विकारले प्रकरणी कारवाई.
पुणे : नवीन घराची कर आकारणी कमी करून देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या कर संकलन विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.सुमित राजेंद्र चांदेरे (वय 28) आणि प्रशांत शिवाजीराव घाडगे (वय 34) अशी औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील कर संकलन विभागातील या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
एप्रिल 2024 मध्ये औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात अर्ज केला होता. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी घाडगे यांचेकडे होता. तक्रारदार हे पाठपुरावा करीत असताना कर आकारणी कमी करण्यासाठी तक्रारदार 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. ही बाब तक्रारदार यांनी लोकसेवक सुमित चांदेरे यांना सांगितली. त्यांनीही तक्रारदार यांना घाडगे यांचे सांगण्याप्रमाणे लाच द्यावी लागेल असे सांगितल्याने, तक्रारदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक क्र. १ सुमित चांदेरे व क्र. २ – प्रशांत घाडगे यांनी तक्रारदार यांचेकडे नविन बांधलेल्या घराची कर आकारणी कमी करण्यासाठी व बिल कमी करुन सवलत दिल्याबाबत पंचासमक्ष तडजोडीअंती २५,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, लोकसेवक क्र. १ सुमित चांदेरे यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये २५,०००/- लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहाय्यक पोलीस फौजदार मुकूंद अयाचित, कैलास महामुलकर, दिपक दिवेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली,
१) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४,२) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
