दुचाकी चोर युनिट -१ , गुन्हे शाखा कडून जेरबंद

दिनांक – २६/०८/२०२१ युनिट -१ , गुन्हे शाखा पुणे शहर दुचाकी चोर युनिट -१ , गुन्हे शाखा कडून जेरबंद किंमत रुपये- ४,१०,००० / – च्या एकुण १७ मोटार सायकल्स केल्या जप्त .

ACS POLICE CRIME SQUAD

फिर्यादी श्री सचिन तुकारामजी घुले वय ३० वर्षे रा.पानमला , दत्तवाडी , पुणे , यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी नं.एमएच – ३७ – डी -५३२१ हि दिनांक -२०/०७/२०२१ रोजी सकाळी ०९ .१५ ते १२.३० वा . दरम्यान इंदुलाल कॉम्प्लेक्सचे बाहेर , नवीपेठ पुणे येथे लॉक करुन पार्क करुन ठेवली ती अज्ञात चोरटयाने चोरुन नेले बाबतची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाणेस गुन्हा नोंद क्रमांक -८२/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल झाली मा श्री शैलेश संखे वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांनी संदर्भीय दाखल गुन्हयाचा समांतर तपास करुन तसेच घटनास्ळावरील सी.सी.टि.व्ही कॅमेरे यांची पडताळणी करुन यातील गुन्हेगारा बाबत माहीती मिळवुन गुन्हा उघडकीस आणणेकरीता आदेशित केलेले होते . त्यानुसार युनिट -१ कडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील सी.सी.टि.व्ही . कॅमे – याची पडताळणी केली असता त्यामध्ये एक इसम मोटार सायकल घेवुन जात असताना दिसून आला . त्या इसमाची अधिक माहीती मिळविता सदर इसमाचे नाव समीर रांगावकर असे असल्याचे समजले . त्याचा ठावठिकाणा नव्हता मात्र त्यास कसेही करुन जेरबंद करावयायेथ असा चंगच युनिट -१ कडील अधिकारी व अंमलदार यांनी बांधला यासाठी अधिक प्रयत्न करण्यात आला व चालु असतानाच दिनांक -१८ / ०८ / २०२१ रोजी पोलीस अमलदार शशीकांत दरेकर दत्ता सोनावणे , यांना त्यांच्या मार्फत बातमी मिळाली की , पाहिजे (आरोपी समीर रांगावकर हा नवी पेठ ) निबांळकर याडा या ठिकाणी येणार आहे . अशी खात्रीशिर मिळाली . त्यानुसार गुप्तपणे सापळा लावला .( आरोपी समीर रागावकर )हा दुचाकीवर नवी पेठ , निबाळकर वाडा , पुणे . या ठिकाणी आला . तो( समीर रागावकर )असल्याची आमची खात्री होताच पोलीस असले बाबतची कोणतीही चाहुल लागु न देता त्यास शिताफीने मोटार सायकलसह ताब्यात घेतले . त्यांच्याकडे मिळालेल्या दुचाकीसह युनिट -१ , कार्यालय येथे आणून त्यांच्याकडे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव (सम्या ऊर्फ समीर दत्तात्रय रांगावकर वय ३४ वर्षे रा .६५२/२ , विसावा कॉप्लेक्स , विमाननगर , पुणे मुळगाव -) मु.पो.रांगव ता.संगमेश्वर जिल्हा- रत्नागिरी असे असल्याचे सांगितले . त्याचेकडे ताब्यात मिळुन आलेल्या हिरो होंडा पॅशन मोटार सायकल नं एमएच – १२ / ईंचाय / ३९०१ बाबत तपास करता त्याने प्रथम उडवा – उडवा उडवीची उत्तरे देवुन नमुद मोटार सायकल बाबत योग्य उत्तरे देण्यास तो असमर्थ ठरला असता सदर गाडी बाबत पोलीस अभिलेखावरील माहीती घेता सदर मोटार सायकल बाबत विमानतळ पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक -६०१ / २०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल असल्याची माहीती मिळाली . सदर मोटर सायकल ही नमुद आरोपी याने चोरी केलेचे कबुल केले सदरची दुचाकी नं एमएच -१२ / ईचाय / ३९०१ किमत रुपये -३०,००० / – हि जप्त करण्यात आली . यातील आरोपी सम्या ऊर्फ समीर दत्तात्रय रांगावकर याची पोलीस कोडठी रिमांड घेणुन त्याचेकडे अधिक तपास करता त्याने प्रथम काही सांगण्यास नकार दिला . परंतु त्यास पोलीस खाक्या दाखविताच त्याने पुणे शहर , पिंपरी चिंचवड , पुणे ग्रामिण इ . ठिकाणावरुन मोटार सायकल्स चोरल्याचे कबुल करुन चोरी केलेल्या मोटार सायकल्स विक्रीकरीता लपकन ठेवलेल्या जागा दाखवुन किमंत रुपये -३,८०,००० / – च्या एकुण १६ मोटार सायकल्स काढून दिल्या । त्या गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करुन विश्रामबाग पोलीस ठाणेकशील -३ , विश्रांतवाडी पोलीस ठाणेकडील -१ , विमानतळ पोलीस ठाणेकडील -३ , येरवडा पोलीस ठाणेकडील -१ , चाकण पोलीस ठाणेकडील – २.भोसरी पोलीस ठाणेकडील -२ , दिघी पोलीस ठाणेकडील -१ , लोणावळा शहर पोलीस ठाणेकडील -१ , राजणगांव पोलीस ठाणेकडील -१ , निगडी पोलीस ठाणे कडील -१ , असे १६ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत . एका मोटार सायकलचे मालक मिळून आलेले नाहीत . ( १ ) काळे रंगाची त्यावर निळया व लाल रंगाचे पट्टे असलेली हिरो होंडा स्प्लेंडर आर.टी.ओ.क्रमांक नाही . चैसी नं , 98M19 . C02369 इंजिन नं . 98MI7M02598 बाबत तपास करण्यात येत आहे . नमुद गाडी ज्याची असेल त्यांनी युनिट १ , गुन्हे शाखा पुणे शहर येथे संपर्क साधावा . यातील आरोपी विरुध्द ओरस पोलीस ठाणे जिल्हा सिंधुदुर्ग येथे वाहन चोरी केले बाबत गुन्हा नोंद क्रमांक -५८ / २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयात त्यास अटक झालेली आहे .

सदरची कामगिरी मा पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री अशोक मोराळे , मा.पोलीस उप – आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवास धाडगे , मा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -१ श्री सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शैलेश संखे वरीष्ठ पोलीस निरीक्षक , युनिट -१ , गुन्हे शाखा पुणे शहर , पोलीस उप – निरीक्षक श्री सुनिल कुलकर्णी , संजय गायकवाड पोलीस अंमलदार , शशीकांत दरेकर दत्ता सोनावणे , सतीश मालेकर , अमोल पवार , विजेसिंह पसावे अशोक माने , इम्रान शेख , अय्याज दडीकर , अजय थोरात , महेश बामगुडे , तुषार माळवदकर , राहुल मखरे , अनिकेत बाबर मिना पिजंण रुक्साना नदाफ यांनी केलेली आहे . पुढील अधिक तपास पोलीस उप निरीक्षक श्री सुनिल कुलकर्णी करीत आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *