समर्थ पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी बोलाई माता मंदीरातील चोरी करणारा सराईत गुन्हेगार अटक.

ACS POLICE CRIME SQUAD

समर्थ पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी बोलाई माता मंदीरातील चोरी करणारा सराईत गुन्हेगार अटक. दिनांक – २६/०८/२०२१ समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर बोलाई माता मंदीरातील चोरी करणारा सराईत गुन्हेगार जाळयात

दि .१२ / ०८ / २०२१ रोजी समर्थ पोलीस ठाणेच्या हद्दीतील बोलाई माता मंदीर , जूनी जिल्हा परीषद , पुणे येथे रात्री ०९ / ३० वा.चे दरम्यान देवीच्या चांदीच्या दागीन्यांची चोरी झाली होती . मंदीरातील चोरी म्हणजे पोलीसांसमोर एक मोठे आव्हान होते . सदरचे आव्हान समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने स्वीकारून सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाच्या आधारे चोरी झाली त्याच रात्री पासून अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला होता . सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हा चोरलेल्या सामानासह पुणे स्टेशन व आसपासच्या भागात फिरला होता . त्यावरून तपास पथकाने सर्व सीसीटीव्ही फुटेज , बातमीदार व इतर सर्व प्रकारे रात्रंदिवस तपास करून बातमी प्रमाणे आरोपीचा पुणे शहर व परीसरात आरोपीचा शोध घेतला . फुटेज मधील आरोपीची ओळख पटविण्यासाठी आसपासच्या नागरीकांना फुटेज दाखवून आरोपीची ओळख पटवून तपासाची दिशा ठरविण्यात आली .

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

त्या अनुषंगाने दि . २३/८/२०२१ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना बारणे रोड , मंगळवार पेठ पुणे येथे सीसीटीव्ही मधील संशयीत आरोपी दिसून आला . त्यास ताब्यात घेवून त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव अनिल हौशिलाल चव्हाण वय -३१ वर्षे , रा – मु.पो.वडजाई , ता.हवेली ( वाघोली ) जि.पुणे . असे असल्याचे सांगितले . त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दि . १२/०८/२०२१ रोजी फिर्यादी यांचे बोलाई माता मंदीरामध्ये चोरी केले बाबत सांगीतले . त्याचे अंगझडतीमध्ये गुन्हयात चोरी झालेली चांदीची घंटी मिळून आलेने जप्त करण्यात आली आहे . तसेच सदर आरोपीच्या पोलीस कस्टडी दरम्यान गुन्हयातील इतर चोरी झालेल्या मौल्यवान चांदीच्या वस्तू पंचनाम्याने जप्त करण्यात आल्या आहेत . सदर बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुरनं . १४१/२०२१ भादविक . ४५७ ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

सदर गुन्हयाचा तपास सपोनिरी . श्री संदीप जोरे हे करीत आहेत . सदरची कामगिरी ही मा . राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – १ पुणे शहर , मा . श्री . सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे श्री . विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , श्री . उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक , संदीप जोरे , सपोउपनिरी सतिश भालेराव , पोलीस अंमलदार सुशील लोणकर , संतोष काळे , सुभाष पिंगळे , महेश जाधव , सुभाष मोरे , शुभम देसाई , हेमंत पेरणे , विठ्ठल चोरमले , निलेश साबळे , सुमित खुट्टे , यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *