युनिट -१ , गुन्हे शाखेची कामगिरी – माधव वाघटे गुन्हेगाराच्या खुनातील मुख्य आरोपी कडुन १ पिस्टल २ जिवंत काडतुस जप्त.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

युनिट -१ , गुन्हे शाखेची कामगिरी – माधव वाघटे गुन्हेगाराच्या खुनातील मुख्य आरोपी कडुन १ पिस्टल २ जिवंत काडतुस जप्त.

युनिट-1,गुन्हे शाखा,पुणे शहर

माधव वाघटे गुन्हेगाराच्या खुनातील मुख्य आरोपी कडुन १ पिस्टल २ जिवंत काडतुस जप्त व सराईत गुन्हेगारा कडुन ४ कोयते,१ चॉपर,१ तलवार असा अवैध मोठा शस्त्रसाठा जप्त दोघांना अटक.

युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार ची कामगिरी .

दिंनाक १५/०५/२०२१/ रोजी सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे माधव वाघाटे यांचा बिबवेवाडी येथे खुन झाला होता.त्यामध्ये सावन गवळी,आनंद कामठे व साथीदार असे ९ आरोपी अटक करण्यात आले होते

त्या गुन्हेगारांची मयत बॉडी आणलेनंतर पुढील अंत्यविधी करीता कात्रज स्मशानभुमी येथे अॅम्ब्युलन्सचे मागे किमान १०० ते १२५ दुचाकी वाहनावर बालाजीनगर ते कात्रज स्मशानभुमी दरम्यान रॅली काढुन दहशत निर्माण केली होती. त्याबाबत सहकारनगर व भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.

माधव वाघाटेच्या ख्ुनातील मुख्य आरोपी सावन गवळी व इतर आरोपीहे २ महिन्यापुर्वी जामिनावर सुटले होते. 

         

दिनाक-०३/०२/२०२२ रोजी युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे युनिट १ च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, माधव वाघाटे या गुन्हेगाराच्या खुनातील मुख्य गुन्हेगार सावन गवळी हा बिबवेवाडी ओटा नं १९३ सुहाग मंगल कार्यालय समोर पुणे त्याचे राहते घरा बाहेर उभा असून त्यांचेकडे पिस्टल हे हत्यार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे युनिट १ गुन्हे शाखा यांचे परवानगीने युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड स्टाफसह जावुन छापा घातला असता सदर इसम मिळुन आल्याने त्याचे नाव सावन सुभाष गवळी वय २४ वर्षे , रा . बिबवेवाडी ओटा नं १९३ सुहाग मंगल कार्यालय समोर पुणे असे असल्याचे सांगीतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पँन्टमध्ये कंबरेस डावे बाजुस खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व त्याचे मध्ये ०२ जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदरचा ६२,०००/- रु किमतीचा माल जप्त करुन त्याचेविरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३/२०२२ आर्म अॅक्ट क ३(२५) व महा.पो.अधि. क ३७(१) सह १३५ प्रमाणे पोलीस अंमलदार अमोल पवार यांनी फिर्याद देवुन गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरचे पिस्टल जवळ बाळगण्याचा मुख्य उद्देश काय आहे या बाबत अधिक तपास करता त्याने सांगितले माधव वाघाटेचा ख्ुन केल्याने त्याच्या मित्र परिवारा पासुन जिवाला भिती असल्याने सदरचे पिस्टल ठेवले होते अशी माहिती पोलीसांना दिली आहे.

    तसेच युनिट-१ चे पोलीस अंमलदार यांना त्यांच्या बातमीदारा बातमी मिळाली की,प्रशांत महागंरे हा त्याचे शंकर महाराज वसाहत,घर नं.१४३,धनकवडी,पुणे हा राहते घरी असून त्याच्याकडे घातक कोयते व तलवार असून ती त्याने ज्ञानेश्वर हौसींग सोसायटी, एस. आर. बिल्डींग, पहिला मजला खोली नं. १०६,शंकरमहाराज वसाहत, धनकवडी, पुणे. येथील खोलीत ठेवलेली आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठांना कळवुन त्यांचे परवानगीने युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी स्टाफसह बातमीप्रमाणे छापा घातला असता सदर इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रशांत विलास महागंरे वय ३४ वर्षे, अखील यशवंतराव चव्हाणनगर, शंकरमहाराज वसाहत,घर नं.१४३,धनकवडी,पुणे असे सांगितले व त्याचे कब्जात किंमत रुपये-३६००/- चे ०१ स्टील चॉपर,०४ कोयते व ०१ तलवार अशी घातक शस्त्रे मिळुन आल्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३२/२०२२ आर्म अॅक्ट क ४(२५) व महा.पो.अधि.क.३७(१) सह १३५ प्रमाणे पोलीस अंमलदार अय्याज दड्डीकर यांनी फिर्याद देवुन गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 

सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री . अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त श्री . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे , पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , थोरात , इम्रान शेख , अय्याज दड्डीकर , सतिश भालेकर , राहुल मखरे , माळवदकर , महेश बामगुडे , मीना पिंजन , रुक्साना नदाफ , यांनी केली आहे . सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार अमोल पवार , अजय अशोक माने , शशीकांत दरेकर , तुषार ( शैलेश संखे ) वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *