फरासखाना पोलिसांची कामगिरी रिक्षा चोरटयाकडुन चोरीच्या ४ रिक्षा जप्त .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक ०४/०२/२०२२ फरासखाना पोलीस स्टेशन , पुणे शहर फरासखाना
पोलीसांनी सराईत रिक्षा चोरटयाकडुन चोरीच्या ४ रिक्षा जप्त केले ..
फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील प्रभारी अधिकारी अभिजीत पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक हे तपास पथकातील पोलीस अंमलदारांसह वाहन चोरांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण , अभिनय चौधरी यांना फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०१/२०२१ भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेले रिक्षा क्रमांक एम.एच.१२.सी.टी. २८९५ ही रिक्षा सराईत रिक्षाचोर संतोष ऊर्फ अशोक चंद्रकांत ढेरे , वय ४६ वर्षे , रा . सध्या चाकण चौक , गोंधळे आळी , केळगाव रोड , आळंदी , पुणे मुळ गाव राशींद , ता . कर्जत , जि . अहमदनगर याने चोरी केली असुन तो सध्या आळंदी येथे आहेअशी माहीती सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरुनमिळाली .
त्यानुसार सदर आरोपी संतोष ऊर्फे अशोक चंद्रकांत ढेरे याचा फरासखाना पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार मेहबुब मोकाशी , मोहन दळवी यांनी आळंदी , चाकण चौक , गोंधळे आळी , केळगाव रोड , पुणे येथे जावुन शोध घेवुन तो त्याचे राहते घरी मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे . अटके दरम्यान आरोपी संतोष ऊर्फे अशोक चंद्रकांत ढेरे याचेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक , अभिजीत पाटील , व मनोज अभंग हे तपास करीत असताना त्याने फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतुन १ , लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतुन २ व चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतुन १ अशा ४ रिक्षा चोरी केली असल्याची कबुली दिल्याने
त्याचेकडुन खालील प्रमाणे एकुण १,४०,००० / – रुपये किंमतीच्या ४ रिक्षा जप्त केल्या आहेत . त्या गाड्यांबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत .
१ ) १०,००० / – रुपये किंमतीची एक बजाज कंपनीची रिक्षा नं . एम . एच . १२ सी.टी .२८९५ जु.वा. किं.अं. ( फरासखाना पोलीस स्टेशन , पुणे शहर गुन्हा रजि नंबर १०१/२०२१ भादवि कलम ३७९ )
२ ) ४०,००० / – रुपये किंमतीची एक बजाज कंपनीची रिक्षा तिचा नंबर एम . एच.१२.डी.टी. ४५१६ जु.वा. किं.अं.
३ ) ४०,००० / – रुपये किंमतीची एक बजाज कंपनीची रिक्षा तिचा नंबर एम . एच . १२.एफ.सी. १९१८ , जु.वा. किं . अं . ( लष्कर पोलीस स्टेशन , पुणे शहर गुन्हा रजि नंबर १११/२०२१ भादवि कलम ३७९ )
४ ) ५०,००० / – रुपये किंमतीची एक बजाज कंपनीची रिक्षा तिचा नंबर एम.एच.१२.ई. क्यु . १७०३ जु.वा. कि.अं.( चंदनगर पोलीस स्टेशन , पुणे शहर गुन्हा रजि नंबर १८३ /२०२१ भादवि कलम ३७९)
सदरची कारवाई मा अभिताभ गुप्ता सो , पोलीस आयुक्त , पुणे शहर , डॉ . रविंद्र शिसवे सो सह पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री . राजेंद्र डहाळे , मा . अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर , सागर पाटील , मा . पोलीस उप आयुक्त परिमंडळ -२ अतिरीक्त कार्यभार परीमंडळ १ , पुणे , मा . श्री . सतिश गोवेकर सो मा सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशन कडील श्री . राजेंद्र लांडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , शब्बीर सय्यद , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , अभिजीत पाटील , मनोज अभंग , सहाय्यक पोलीस निरीक्षक , पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण , अभिनय चौधरी , सचिन सरपाले मेहबुब मोकाशी , मोहन दळवी , रिजवान जिनेडी , वैभव स्वामी राकेश क्षिरसागर , ऋषीकेश दिघे , विशाल साबळे , महावीर वलटे यांच्या पथकाने केली आहे .
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526