Unit-२ ची धडाकेबाज कामगिरी – सराईत अट्टल चोरांकडून ६३ मोबाईलसह आरोपी जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

Unit-२ ची धडाकेबाज कामगिरी – सराईत अट्टल चोरांकडून ६३ मोबाईलसह आरोपी जेरबंद .

आज रोजी Unit -२ कडील स्टाफ बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पुणे स्टेशन PMT स्टॉप शेजारील मुतारी लगत दोन इसम चोरीचे मोबाईल विक्री करिता आले असल्याची खात्रीलायक बातमी Unit-2 कडील PC/कादिर शेख व HC समीर पटेल याना मिळाली, सदरबाबत लागलीच Unit-२ प्रभारी मा.पो.नि. क्रांतिकुमार पाटील सो. याना अवगत करता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने Unit-2 कडील API मोहिते व स्टाफ यांनी बातमी ठिकाणी धाव घेत प्राप्त वर्णनावरून दोन संशयित इसमास ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी करता त्याने त्याचे

नाव कुंदन रमेश शिंदे वय २८ रा. कात्रज पुणे

अजित गणेश पवार वय २५ रा मलधका चौक पुणे

असे असल्याचे सांगून ते चौकशीत असंबंध माहिती देऊ लागल्याने त्यास Unit-2 कार्यालयात आणून त्याची अंगझडती घेता त्याचे ताब्यात ( OnePlus )कंपनीचा मोबाइल मिळून आला, सदर मोबाइल बाबत विचारणा करता, त्याने सदरचा मोबाईल पुणे स्टेशन येथे PMT स्टॉप वर गर्दीचा फायदा घेऊन चोरल्याचे सांगितले.


सदर मोबाईल चोरी अनुषंगाने बंडगार्डन पो.स्टे. कडिल रेकॉर्डची पडताळणी करता, बंडगार्डन पो.स्टे. CR 46/22 IPC 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजून आले, त्यानंतर त्यांची अजून कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात चोरीचे ६३ मोबाईल मिळून आले त्याची किंमत २,४९,५००/- अशी असून आरोपी ची वैद्यकीय तपासणी करून त्यास रितसर पुढील कार्यवाहीकामी बंडगार्डन पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपीचा पूर्वेतिहास :- नमूद आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पुणे शहरात विविध पो.स्टे.ला मोबाइल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली API विशाल मोहिते, PSI राजेंद्र पाटोळे, ASI अस्लम पठाण पो.अंमलदार संजय जाधव, साधना ताम्हाणे,गजानन सोनुने, किशोर वग्गु, समीर पटेल, मितेश चोरमोले, कादिर शेख, चंद्रकांत महाजन, निखिल जाधव, यांनी केलेली आहे

   

(क्रांतीकुमार पाटील) वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा, युनिट २

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526




फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *