पीएमपीएल चालकाचा दगडाने ठेचुन निघुन खुन करणारे चार नराधमांना २४ तासाच्या आत युनिट ६ ने केले जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक- १२/०७/२०२१ युनिट ६. गुन्हे शाखा पुणे शहर पीएमपीएल चालकाचा दगडाने ठेचुन निघुन खुन करणारे चार नराधमांना २४ तासाच्या आत युनिट ६ ने केले जेरबंद

ONLINE PORTAL NEWS 9822331526

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु . र . क्र . ३६६/२०२१ भादवि कलम ३०२ , दिनांक ११/०७/२०२१ अन्वये दाखल असून नमूद गुन्हयाचा गुन्हे शाखा , युनिट ६ मार्फतीने समांतर तपास चालु असताना गुन्हयातील मयत इसम नामे गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुखे . वय २९ वर्षे या पीएमपीएल चालकाचा दगडाने ठेचुन निघुन खुन करून आरोपींनी गुन्हा करतेवेळी कोणताही पुरावा मागे न सोडता गुन्हा करून पळुन गेले होते . गुन्हा घडण्यापुर्वी पोना नितीन मुंढे , पोना नितीन शिंदे पोना कानिफनाथ कारखेले , पोशि ऋषिकेश टिळेकर व पोशि शेखर काटे यांनी मयत इसम हा नोकरीवरुन सुटल्यानंतरचे त्याचे हडपसर भागातील खाजगी सीसीटीव्ही फुटेज तपासुन व पोना प्रतिक लाहिगुडे यांनी टेक्नीकल अॅनालिसीस करून तसेच पोना नितीन मुंढे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन सदरचा गुन्हा हा ऋषिकेश बोरगावे व अक्षय जाधव यांनी केला असून ते उमरगा , जि . उस्मानाबाद येथे पळून गेले आहेत ,

अशी खात्रीशीर बातमी मिळाली . सदरची माहिती श्री गणेश माने , पोलीस निरीक्षक , गुन्हे शाखा , युनिट ६ यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नरेंद्र पाटील व पथक यांनी उमरगा येथे जावून पूणे हैद्राबाद रस्त्यावरील लॉजेस तपासले असता आरोपी नामे

१ ) ऋषिकेश संजय बोरगावे , वय ३१ वर्षे , व्यवसाय- रिक्षाचालक , रा . स . नं . २१४ , गुरुदत्त कॉलनी , घर नं ३१०० , भेकराई नगर , फुरसुंगी , पुणे ४१२ ३२८ ,

२ ) अक्षय हनुमंत जाधव , वय २१ वर्षे , व्यवसाय- नोकरी , रा . साईसदन सोसायटी , फ्लॅट नं ३०३ , आयबीएम समोर , कोमलविलास हॉटेलच्या शेजारची गल्ली , फुरसुंगी , हडपसर , पुणे

हे आंबिका लॉज , उमरगा येथे मिळून आले . त्यांनी त्यांचे साथीदार नामे आकाश राठोड , प्रज्वल जाधव व तुषार जगताप यांच्या मदतीने इसम नामे गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुखे , वय २९ वर्षे यांचा खुन केल्याचे कबूल केले . त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या मदतीने इतर आरोपी नामे

३ ) प्रज्वल सचिन जाधव , वय २० वर्षे . व्यवसाय- नाही . रा . बिजलीनगर सोसायटी , कॉलनी नं २ , काळेपडळ , हडपसर , पुणे .४ ) तुषार सुर्यकांत जगताप , वय २१ वर्षे , व्यवसाय – हेल्पर नोकरी , रा . साईनाथ वसाहत , स . नं . २३३ , गाडीतळ , हडपसर , पुणे यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी त्यांना लोणी काळभोर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह – आयुक्त पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे . मा . अपर पोलीस आयुक्त गुन्हे , पुणे शहर , श्री अशोक मोराळे , मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर , श्री श्रीनिवास घाडगे , मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर , श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने , सपोनि नरेंद्र पाटील , पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके , नितीन मुंढे , कानिफनाथ कारखेले , नितीन शिंदे , प्रतिक लाहिगुडे , सचिन पवार , ऋषिकेश ताकवणे , ऋषिकेश व्यवहारे , ऋषिकेश टिळेकर , शेखर काटे , नितीन घाडगे , सुहास तांबेकर , तांत्रिक विश्लेषण विभागाचे सलीम तांबोळी व संदेश निकाळजे यांचे पथकाने केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *