४ वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीस खंडणी विरोधी पथक – ने सुरत येथून केले जेरबंद .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – १२/०७/२०२१ खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर मोक्का अन्वये दाखल गुन्हयामध्ये ४ वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीस खंडणी विरोधी पथक – ने सुरत येथून केले जेरबंद . सदर आदेशाचे अनुशंगाने खंडणी विरोधी पथक -२ चे पोलीस श्री.निरीक्षक बालाजी पांढरे यांचे पथक मोक्क्यामधील पाहीजे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांना माहिती मिळाली की , येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ७५७/२०१७ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३,४,५ मोक्का अधिनियम कलम ३,४ अन्वये दाखल गुन्हयामधील पाहिजे आरोपी नामे एजंट शिवा ऊर्फ शिवा राजकुमार चौधरी , वय ३७ वर्षे , मुळ रा . नेपाळ हा गुन्हा दाखल झाल्यापासून नेपाळ येथे पळून गेलेला होता . तो गले १५ दिवसांपासून सुरत , गुजरात या ठिकाणी आलेला असून त्याचे मित्राकडे राहत आहे . वगैरे माहिती मिळाल्याने
मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री.अशोक मोराळे मा.पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री.श्रीनिवास घाडगे , मा . सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे -२ श्री.लक्ष्मण बोराटे , खंडणी विरोधी पथक -२ चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि विजय झंजाड , पोहवा प्रदिप शितोळे , पोना प्रविण पडवळ असे पथक तयार करून सुरत या ठिकाणी पाठविण्यात आले होते . सदर पथकाने आरोपीस इच्छापूर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये भाटपोर या ठिकाणाहून सुरत गुन्हे शाखेच्या मदतीने पकडून पुणे या ठिकाणी आणले असून त्यास दाखल गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेली आहे .
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) श्री . अशोक मोराळे , मा.पोलीस उपआयुक्त ( गुन्हे ) श्री.श्रीनिवास घाडगे , सहा.पोलीस आयुक्त , गुन्हे -२ श्री . लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बालाजी पांढरे , पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे विनोद साळूके , शैलेश सुर्वे , सुरेंद्र जगदाळे , सचिन अहिवळे , प्रविण पडवळ , आशा कोळेकर , संपत अवचरे , विजय गुरव , राहुल उत्तरकर , संग्राम शिनगारे , अमोल पिलाने , प्रदिप गाडे , मोहन येलपल्ले , चेतन शिरोळकर , रुपाली कर्णवर सर्व नेमणूक खंडणी विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा यांनी केलेली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
ONLINE PORTAL NEWS
CRIME REPORTER RAEES KHAN
9881888008