खुन्नसने काय बघतो . गुरम घारी वरून भांडणं लष्कर पोलीस स्टेशन मधी गुन्हा दाखल.
ACS POLICE CRIME SQUAD
दिनांक ३१/१०/२०२१ रोजी रात्री ०८/३० वा . सुमारास फिर्यादी यांना २२८९ , न्यु मोदीखाना , कॅम्प पुणे ०१
येथे फिर्यादीचे परिचयाच्या आरोपी आजम , झेन , अशमीर , अनुश उर्फ डोना यांनी आमच्याकडे खुन्नसने काय बघतो असे म्हणुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी पालघन , पंच ( फायटरने ) मारहाण करुन जबर जखमी करुन शिवीगाळ केली .
म्हणून लष्कर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३०७,५०४,३४ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी लष्कर हद्दीत व परहद्दीत माहिती काढली असता मिळालेल्या माहिती नुसार मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो व मा . पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सो यांचे दिमतीत तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सापळा रचुन दाखल गुन्हयाचे आरोपी नामे
१. डोना उर्फ अनॉष आनंद चंदनशिव वय १८ वर्षे रा.शादाप टॉवर रुम नंबर ९०१ नव्वा मजला चुडामन तालीम ७७५ भवानीपेठ पुणे
२. जैन असगर शेख वय १८ वर्षे रा . शादाप टॉवर रुम नंबर ३०२ , दुसरा मजला चुडामन तालीम ७७५ भवानीपेठ पुणे
३.अशमेर जमीर सैय्यद वर्षे १९ वर्षे रा . भंडारशहा मस्जीद शेजारी , बी.टी. शहाने शाळे समारे चुडामन तालीम ७४० भवानीपेठ पुणे यांना अवघ्या २४ तासाच्या आत ताब्यात घेवून त्यांना
मा . न्यायालया समोर हजर करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे . सदर गुन्हयाचा तपास श्री . प्रल्हाद डोंगळे पोलीस उप निरीक्षक , लष्कर पोलीस स्टेशन हे करत . .
सदरची कामगीरी ही मा.पोलीस उप आयुक्त श्री सागर पाटील सो परि .२ पुणे व मा . सहा . पोलीस आयुक्त श्री चंद्रकांत सांगळे लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शना खाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कदम सो , तसेच पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री.कालीदास जांभळे यांचे नेतृत्वाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरिक्षक श्री . प्रल्हाद डोंगळ , तपास पथकातील पो.हवा . महेश कदम , पो.हवा . दत्तात्रय तेलंगे , म.पो.हवा . मंगल लाकडे , पो.ना. सचिन मांजरे , पो.ना. इम्राण नदाफ , पो.अ. चक्रधर शिरगिरे , पो . अ . पवन भोसले पो.अ. सागर हुवाळे यांनी केलेली आहे .
(अशोक कदम) वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,लष्कर पोलीस स्टेशन पुणे
ACS POLICE CRIME SQUAD
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526