दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा ची कामगिरी.एकुण ३७,६०,६०० / – रुपये एवढे किंमतीचा मुद्देमाल जप्त.

ACS POLICE CRIME SQUAD

राज्यात व परराज्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद . दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा ची कामगिरी.

दिनांक ०२/११/२०२१ दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर . राज्यात व परराज्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद .

येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं .४५० / २०२१ भा.द.वि. कलम ४५४ , ४५७ , ३८० , ३४ या गुन्ह्यात ११२ तोळे सोन्या चांदीचे दागिने व इतर किंमती वस्तु दिनांक ०५ / ०९ / २०२१ रोजी घरफोडी करुन चोरीस गेले असताना सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्र .२ हे करीत असताना दिनांक १७/१०/२०२१ रोजी पोलीस उप निरीक्षक , गुंगा जगताप व पोलीस नाईक , शिवाजी जाधव असे दोघांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नमुद दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे विश्वनाथ नानावत हा त्याचे मित्राला भेटण्याकरीता हडपसर येथील आकाशवाणी कार्यालयाचे गेटजवळ येणार आहे . त्याने अंगात काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट व काळ्या रंगाची टोपी असे कपडे घातलेले आहे . अशी खात्रीशिर बातमी मिळालेने बातमीप्रमाणे पथक प्रमुख वपोनि सुनिल पंधरकर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे त्यांचे पथक बातमीचे ठिकाणी सापळा रचुन नमूद आरोपी यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव विश्वनाथ शर्मा नानावत , वय ३१ वर्षे , रा . मु.पो. वसाडे , ता . वेल्हे , जि . पुणे असे असल्याचे सांगितले . त्यास ताब्यात घेवुन , त्याचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने त्यास विश्वासात घेवून चौकशी करता , त्याने सदरचा गुन्हा त्याचे दोन साथीदार यांचेसोबत केला असल्याचे कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेऊन त्याचेकडे गुन्हयातील चोरीस गेलेले ५३ लाख ४६ हजाराचे सोने चांदीचे दागिने व इतर किंमती वस्तूबाबत तपास करता , त्याने दाखल गुन्हयातील सोने गुजरात व मध्यप्रदेश राज्यात आरोपी इसम नामे

१ ) नंदकिशोर वाघमल सोनी , वय ५४ वर्षे रा . बुधा अपार्टमेंट , आंबावाडी , गोविंदनगर , दाहोट , गुजरात

२ ) शामकुमार चुन्नीलाल सोनी , वय ५४ वर्षे , धंदा सुवर्णकार , रा . २८ , बिचलावास , संत मिरा शाळेचेजवळ , थावरीया बाजार , रतलाम , मध्यप्रदेश यांच्या मदतीने सोनार नामे अक्षय अशोक जैन , वय ३१ वर्षे , रा . ए २५ , बालाजीनगर , रतलाम , मध्यप्रदेश यांना सदर घरफोडीतील काही माल विकलेने सदर तीन आरोपी यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडून खालील प्रमाणे मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे . .

१ ) २०,००,००० / -रु.किं . च्या २ सोन्याच्या लगड ५०० ग्रॅम वजनाच्या

२ ) १६,००,००० / -रु . किं . च्या ७ सोन्याच्या लगड ४०३ ग्रॅम वजनाच्या

३ ) १,२५,००० / – रु . किं . ची यामाहा एच एफ डिलक्स मो . सा . नं . एम . एच . १४ / जे के / ९१५२

४ ) २०,००० / – रु.किं . ची यामाहा मोटर सायकल नं . एम . एच . १२ / एस आर / ७१९४

५ ) १०,००० / – रु.रु. किं . चे १ टायटन कंपनीचे घड्याळ ,

६ ) ५,००० / – रु . किंमतीचे २ जोड चांदीच्या पट्टया

७ ) ६०० / -रु . किंमतीची १ जोड चांदीची जोडवी एकुण ३७,६०,६०० / – रुपये एवढे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर अटक आरोपी विश्वनाथ शर्मा नानावत याचे दोन साथीदार गुन्हा केल्यापासून फरार असून , विश्वनाथ शर्मा याचेवर हवेली , वेल्हा , पुणे , विजापुर नाका पो स्टे , सोलापुर शहर , उस्मानाबाद , तेलंगणा , कर्नाटक राज्य इत्यादि ठिकाणी गुन्हे दाखल आहेत .

सदरची कारवाई ही मा . पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , मा.सह पोलीस आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , मा . सहा पोलीस आयुक्त , गुन्हे – २ श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सुनिल पंधरकर , सहा . पोलीस निरीक्षक , विवेक पाडवी , पोलीस उप निरीक्षक , गुंगा जगताप व पोलीस अंमलदार राजेश अभंगे , दिनकर लोखंडे , राजेश लोखंडे , विनायक रामाणे , शाकीर खान , सुदेश सपकाळ , गणेश लोखंडे शिवाजी जाधव , दत्तात्रय खरपुडे व अमोल सरतापे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *