पेट्रोल – डिझेल – गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरीत मागे घ्यावी पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना दिले निवेदन विदर्भ राज्य आंदोलन
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL
Kazi Sharik Yavatmal reporter
पुसद :- विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी पुसद च्या वतीने आज दि . 16 जूनला पेट्रोल – डिझेल – गॅस व इतर वस्तूच्या प्रचंड जिव घेण्या दरवाढी विरोधात सर्व जिल्हा व तालुका स्तरावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी , पुसद यांना निवेदन देण्यात आले . मा . पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उपविभागीय अधिकारी , पुसद यांचे मार्फत निवेदन पाठवून पेट्रोल – डिझेल – गॅस व इतर वस्तूंची प्रचंड झालेली दरवाढ त्वरीत कमी करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले व निदर्शने करण्यात आली . कोरोनाच्या महामारी मध्ये जनतेचे जगने कठिन झाले आहे . रोजगार , व्यापार , शेती , व्यवहार सर्व ठप्प झाले आहे . अशा वेळेस ही सतत दरवाढ करून केंद्र सरकार जनतेची लुटमार करीत आहे . आम्ही निवडून आलो तर पेट्रोल – डिझेल – गॅस सहीत महागाई कमी करू असे आश्वासन भाजपा सरकारने दिले होते , महागाई साठी काँग्रेसवर टिका करणारे भाजपा नेते मात्र केंद्रात भाजपा सरकार बसल्यावर पेट्रोल – डिझेल – गॅसचे भाव दुपटीने वाढविले आहे . या भाववाढीचा विदर्भ राज्य आंदोलन समिती निषेध करते व त्वरीत ही भाववाढ मागे घ्या असे केंद्र सरकारला मा . पंतप्रधान व धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मंत्री यांना आवाहन करते अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन अजून तीव्र करेल.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526