ज्वेलर्सच्या दुकानात रू . 30,42,000 / – किंमतीच्या दागिण्यांची चोरी करणाऱ्या आरोपीतास पवई पोलीस ठाणेकडुन अवघ्या सहा तासांत अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

17.06.2021 ज्वेलर्सच्या दुकानात रू . 30,42,000 / – किंमतीच्या दागिण्यांची चोरी करणाऱ्या आरोपीतास पवई पोलीस ठाणेकडुन अवघ्या सहा तासांत अटक

ONLINE PORTEL NEWS

दिनांक 16.06.2021 रोजी पवई पोलीस ठाणे हद्दीतील तुंगा गाव येथील ” रिया गोल्ड ” या सोन्या चांदीचे दुकानाचे मालक श्री अशोक कुमार काळुराम मांडोत यांनी पोलीस ठाणेस येऊन कळविले की , त्यांचेकडे नमुद दुकानात काम करणारा इसम नामे हिरालाल लेहरूलाल कुमावत , वय 26 वर्षे , रा.ठि. गाव चोकडी , ता . रेलमगरा , जि . राजसमंद , राज्य – राज्यस्थान हा दुपारी 14.00 वा . ते 14.30 वा . चे दरम्यान एकटाच दुकानात असताना दुकानातील काचेचे शोकेश लोखंडी मुसळीने फोडुन आतमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र , कर्णफुले , पेंडेंट , चैन असे एकुण 676 ग्रॅम वजनाचे दागिणे , अंकि.रू. 30,42,000 / – ची लबाडीने चोरी करून घेऊन गेला अशा फिर्यादीवरून पवई पोलीस ठाणेस गु.र.क्र . 354/2021 , कलम 381 भादविसं प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता . 10 , सदर गुन्ह्याचे घटनास्थळी ताबडतोब मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ श्री महेश्वर रेड्डी , व.पो.नि. आबुराव सोनवणे , पो.नि. संतोष सावंत व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. विनोद पाटील यांनी भेट देऊन नमुद आरोपीताबाबत माहिती घेऊन मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – 10 , मुंबई यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे स.पो.नि. विनोद पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून त्याने एक खाजगी ट्रॅव्हेल्स कंपनीकडुन पवई ते राजस्थान येथे जाण्यासाठी एक इनोव्हा मोटार कार क्र . HR 55 U 8472 ही बुक केली असल्याची माहिती मिळवुन त्या आधारे सदर आरोपी गाडीसह राजस्थान येथे पळुन जात असताना कासा पोलीस ठाणे , जि . पालघर यांचे मदतीने त्यास कासा येथे स.पो.नि. विनोद पाटील व पथक यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणले व आरोपीकडुन गुन्ह्यात चोरलेली वरिलप्रमाणे संपुर्ण मालमत्ता पंचनाम्या अंतर्गत हस्तगत करून सदरचा गुन्हा सहा तासात उघडकीस आणला . आरोपी याचेवर खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र . 114/2021 . कलम 381 भादविसं अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असून तो दिनांक 20.05.2021 रोजी जामिनावर बाहेर आला आहे . सदरची उत्कृष्ठ कामगिरी डॉ . महेश्वर रेड्डी , मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ 10. मुंबई , श्री मुकुंद पवार , मा . सहाय्यक पोलीस आयुक्त , साकीनाका विभाग , मुंबई , श्री आबुराव सोनावणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पवई पोलीस ठाणे , मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सावंत , स.पो.नि. विनोद पाटील , पो.उ.नि. यश पालवे , विजय पाटील , सुधाकर वेलदोडे , वेलदोडे , पो.ह.क्र . 33455 / संतोष देसाई , देसाई , पो.ना.क्र . 4925 / बाबू येडगे , 01276 / नितीन खैरमोडे , पो.ना.क्र . 01488 / ब्रिजेश पवार , पो.ना.क्र . 03467 / गलांडे , 040325 / प्रदिप जानकर , पो.ना.क्र . 060836 / अभिजीत जाधव , पो.शि.क्र . 080190 / अंबादास चौगुले , पो.शि.क्र . 111096 / प्रशांत धुरी यांनी केला आहे . गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

ACS POLICE CRIME SQUAD NEWS

ONLINE PORTEL NEWS 9822331526

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *