एक पाऊल स्वच्छतेकडे – सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख यांचा उपक्रम,
पुणे – विभाग क्रमांक १९, कोंधवा कमेला भागात “एक पाऊल स्वच्छतेकडे” या मोहिमेअंतर्गत सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख यांनी परिसरातील नागरिकांसह स्वच्छता अभियान राबवले.
मोहसिन शेख हे समाजातील गरीब, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी सतत कार्यरत असलेले समाजसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजही गोरगरीबांना मदत करत स्वच्छतेचा संदेश दिला.
स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला व परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. मोहसिन शेख यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
🌿 स्वच्छ समाज हीच खरी ओळख!
