मार्केटयार्ड भागातील ०२ अट्टल गुन्हेगार एम.पी.डी.ए. अन्वये जेरबंद
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत २८ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द
मार्केटयार्ड भागातील ०२ अट्टल गुन्हेगार एम.पी.डी.ए. अन्वये जेरबंद
ONLINE PORTAL NEWS
मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री.अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त , पुणे शहर म्हणून पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी पुणे शहरा मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील व जनतेच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे , तसेच कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पुणे शहरातील टोळी गुन्हेगार , बेकायदेशिर धंदे करणारे , अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे , पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड , दरोडा , जबरी चोरी , घरफोडी चो – या करणारे तसेच शरीर व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेवुन , त्यांचे हालचालीवर नजर ठेवुन त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करुन , त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबतचा आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले आहेत .
१ ) किरण विनोद थोरात , वय -२६ वर्षे रा.सर्व्हे नंबर ५७० आंबेडकरनगर , गल्ली नं . ०२ मार्केटयार्ड पुणे
२ ) सचिन परशुराम माने , वय -२२ वर्षे , रा -४२५ / २६ औदयोगिक वसाहत गुलटेकडी स्वारगेट पुणे .
हे अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहेत . त्यांनी त्याचे साथीदारांसह फरासखाना व कोंढवा पोलीस ठाणे , पुणे . हद्दीमध्ये तलवार , चॉपर , पालघन , लाकडी बांबु , या सारख्या जीवघेणी हत्यारे बाळगुन खुनाचा प्रयत्न , दरोडा , जबरी चोरी , गंभीर दुखापत , घरफोडी , दुखापत , दंगा , बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत . मागील ०६ वर्षामध्ये.त्याचेविरूध्द एकुण १५ गुन्हे दाखल आहेत . त्याचा गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती . तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते . वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्रीमती.अनघा देशपांडे , मार्केटयार्ड पोलीस स्टेशन , पुणे शहर यांनी एमपीडीए कायदयान्वये नमुद इसमांस स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन , मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर यांचेकडे सादर केला होता . मा.पोलीस आयुक्त , श्री.अमिताभ गुप्ता , पुणे शहर यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमांचे विरुध्द दि .३० / ०६ / २०२१ रोजी एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता ०२ गुन्हेगारांना स्थानबध्दचे आदेश पारीत केले आहे . मा.पोलीस आयुक्त , श्री.अमिताभ गुप्ता , पुणे शहर यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणा – या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.त्यानुसार मागील ० ९ महिन्याच्या कालावधी मध्ये २८ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे . यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी या प्रमाणे कारवाई करण्याचे ठरविले आहे .
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526