वानवडी पोलीसाकडुन ए.टि.एम. कार्डस् ची हातचलाखीने आदलाबदली करुन पैसे लुबाडणारा सराईत आरोपी जेरबंद
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दि .०१ / ०७ / २०२१ – वानवडी पोलीसाकडुन ए.टि.एम. कार्डस् ची हातचलाखीने आदलाबदली करुन पैसे लुबाडणारा सराईत आरोपी जेरबंद :
ONLINE PORTAL NEWS 9822331526
वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि , क्रमांक २०७/२०२१ , भा.द.वि. कलम ४२० मधील फिर्यादी हे सेवानिवृत्त दिनांक- ०५/०६/२०२१ रोजी ११/३० वा.चे सुमारास जगताप चौक , येथील स्टेट बँकेचे ए.टी.एम. मधुन मुलाचे शाळेची फि भरण्याकरिता पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे न निघाल्याने आय.डी.बी.आय बँकेचे ए.टी.एम. मध्ये गेले असता पैसे काढताना अनोळखी इसमाने चोरुन त्यांचा पिन पाहीला व दरम्यान त्यांना त्यांचे पत्नीचा फोन आल्याने त्यांचे थोडे लक्ष विचालीत होताच डेबिट कार्ड बदलेले व सदर कार्डचा चापर करुन आरोपी इसमान पुण्यातील दोन नामांकित ज्वेलर्स दुकानात खोटे नाव सांगुन सोने खरेदी करुन ठेवले होते व ३०,००० / – रु . रोख रक्कम देखिल काढली होती . , सदरबाबत वानवडी पोलीस स्टेशनकडुन तपास चालु होता . दरम्यान वानवडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने दाखल गुन्ह्याचा तपास सुरु केला असता आरोपीचे सी.सी.टि.व्ही . फुटेज प्राप्त करुन नमुद आरोपीचे येण्या जाण्याचे रस्त्याचे सुमारे ४० सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासुन तो राहत असलेला कदमवस्ती एरिया शोधुन काढला , परंतु त्याचे नेमके घर मिळुन येत नसल्याने आरोपी सापडत न्हवता , दिनांक .२३ / ०६ / २०२१ रोजी पोहवा संतोष नाईक व पोना संभाजी देवीकर यांचे बामती दाराने नमुद आरोपी संभाजीनगर , लोणी काळभोर येथे आल्याचे कळविताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वानवडी पोस्टे श्री दिपक लगड यांचे मार्गदर्शनाखाली च सुचनेनुसार तपास पथकाचे सपोनि जाधव , पोहवा राजु रासगे , पोहवा संतोष नाईक , पोना संभाजी देवीकर व पोना सागर जगदाळे यांचे पथकाने त्यास ताब्यात घेतले असता त्याचे नाव श्रवण सतीश मिनजगी वय २५ वर्षे रा- कदम चाक वस्ती , लोणी काळभोर , तालुका हवेली , जिल्हा पुणे , मुळगाव- १७ बी , अल्पतनगर , केदारनाथ नगर जवळ , राजराजेश्वरी शाळेजवळ , सोलापुर दक्षीण , सोलापुर शहर . असे असल्याचे सांगितले असता त्याची अंगझडती घेतली असता त्याचे खिशात दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांचे डेबिट कार्ड सह एकूण १८ कार्डस् मिळुन आले सदरबाबत पुढे तपास करता नमुद आरोपीने एकुण २४ लोकांची फसवणूक केल्याची कबुली दिली , केले तपासादरम्यान आरोपीकडुन १,०२,५०० / – चे दोन तोळे वजनाच्या प्रत्येकी एक तोळा वजनाच्या दोन सोन्याच्या वेढण्या व रोख रक्कत २,४५,००० / – रु . जप्त करण्यात आली असून लोणी काळभोर , हडपसर , वानवडी , लष्कर व जेजुरी पोलीस स्टेशन कडील एकुण ५ गुन्हे उघड करण्यात आले आहेत . सदर ए.टि.एम. कार्ड फसवणुकीचे प्रकारामध्ये बरेच व्यक्तींना त्यांचे बँकेत गेल्यावरती कळाले की , त्यांच्या ताब्यात असणारे कार्ड हे त्यांचे नसुन त्रयस्थ व्यक्तीचे आहे , तसेच बरेच जणांनी सायबर फ्रॉड समजुन सायबर पोलीसांकडे व तत्सम बँकांकडे अर्ज केल्याचेही निष्पन्न झाले आहे.नमुद आरोपी हा विविध ए.टि.एम. पायी फिरुन सावजाची वाट पाहत असे , वयस्कर , गोंधळलेले व अशिक्षीत लोक पाहुन त्यांना सावज करीत असे . लोणी काळभोर येथिल एक महीला कोरोना झालेले आपले पती व मुलाचे उपारांकरीता पैसे काढण्याकरीता ए.टि.एम. मध्ये गेल्या असता नमुद आरोपीने त्यांची नजर चुकवुन त्यांचे ए.टि.एम.बदलुन त्यांचे खाते रिकामे केले , त्यामळे त्यांची अवस्था दयनिय झाली होती . सदर हकिकत सांगताना त्यांना रडु कोसळले , इतर फसवणुक झालेले व्यक्ती सुद्धा अशिक्षीत , सेवानिवृत्त व जेष्ठ नागरीक अथवा महिला आहेत
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
आरोपीकडे चौकशी करता त्याने सांगितले की , ए.टि.एम , मशिनमध्ये विसरलेले कार्डस् तो गोळा करीत असे व ज्या व्यक्तीची फसवणुक करावयाची आहे . त्यास त्याच बँकेचे दुसरे कार्ड देत असे , आरोपीने यापुर्वी देखिल असे गुन्हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात केले असुन यापुर्वी त्याचेवर फसवणुकीचे ११ गुन्हे दाखल आहेत .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
तरी पुणे पोलीसांकडुन सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , ए.टि.एम. सेंटर मध्ये आपले पैसे काढताना गोपनियता बाळगायी व आपले कार्डचा पिन कोणासही दिसणार नाही याची दक्षता घ्यावी व पैसे काढण्याकरीता कोणाचीही मदत घेषु नये . सदरची कारवाई ही श्री.अमिताभ गुप्ता सो , पोलीस आयुक्त पुणे शहर , श्री.रविंद्र शिसवे सो.सहा.पोलीस आयुक्त पुणे शहर.श्री.नामदेव चव्हाण सो , अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग , पुणे शहर , श्री . नाता पाटील , पोलीस उप- आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर , श्री . राजेंद्र गलांडे , सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग , पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री . दिपक लगड , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर , श्री.सावळाराम साळगावकर , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक , जयवंत जाधव , सपोफी संतोष तानवडे , पोहया राजु रासगे , अमजद पठाण , संजय बागल , संतोष मोहिते , संतोष नाईक , विनोद भंडलकर , अतुल गायकवाड , पो.ना. संभाजी देविकर , सागर जगदाळे , पोशि अमित चिन्हे , नवनाथ खताळ , सुधीर सोनावणे , गणेश खरात , दिपक भोईर या विशेष पथकाने केली आहे .
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526