वाकड पोलीस असल्याची बतावणी करुन मेडीकल व्यावसायिकाचे अपहरण करुन धमकी देवुन खंडणी मागणारे ०७ आरोपींना वाकड पोलीसांनी केली अटक

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

दि . १७/०६/२०२१ पो . स्टे . – वाकड पोलीस असल्याची बतावणी करुन मेडीकल व्यावसायिकाचे अपहरण करुन धमकी देवुन खंडणी मागणारे तोतया पोलीसांचे तावडीतुन मेडीकल व्यावसायिकाची सुटका करुन ०७ आरोपींना वाकड पोलीसांनी केली अटक > मा . पोलीस आयुक्त , श्री , कृष्णप्रकाश यांनी व्यावसायिकांना खजाणी हफ्ते मागणाऱ्या गुंड प्रतीचे इसमांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दि . १५/०६/२०२५ रोजी ६.१५ वा . चे सुमारास वाकड येथील स्पंदन हॉस्पिटलमधील मेडीकलमध्ये काही लोक पुसन त्यांनी पोलीस असल्याचे सांगुन एमटीपी किटची कारवाई करण्याची धमकी देवुन सदर मेडीकल व्यावसायिकाला खाजगी गाडीतुन घेवुन गेले असल्याबाबतची माहीती पोलीस निरीक्षक गुन्हे श्री . संतोष पाटील यांना मिळाली . त्यांनी तात्काळ मा . पोलीस आयुक्तांचे सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . विवेक मुगळीकर , पोलीस निरीक्षक गुन्हे २ सुनिल टोणपे यांना सदरची माहीती कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि , अशोक जगताप य पौना , विजय वेळापुरे यांना बातमीचे ठिकाणी तात्काळ रवाना केले असता त्यांनी घटनास्थळी जावुन सदर मेडीकल व्यावसायिकाची अपहरणकर्त्या इसमाचे तावडीतुन सुटका केली व पळून जाणारे ०५ आरोपींना ताब्यात घेतले > आरोपींची नावे पुढील प्रमाणे १ ) सिध्दार्थ भारत गायकवाड क्य- ३२ वर्षे , २ ) प्रितेश बबनराव लांडगे वय -३० वर्ष , ३ ) राहुल छगन लोके वय- २४ वर्षे , ४ ) प्रकाश मधुकर स्सगाणे वय ३१ वर्षे . ५ ) कमलेश राजकुमार बाफना वय ३२ वर्षे सर्व रा . वाकड त्यांचे चौकशीमध्ये इतर दोघांची नांवे निष्पन्न झाली त्यांची नांवे – ६ ) संतोष बापु ओहाळ वय २८ वर्षे , रा . वाकड , पुणे , ७ ) आकाश विजय हारकरे वय २७ वर्षे रा . चिखली , पुणे त्यांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले , > यातील पिडीत इसम नामें अशोक बेलीराम आगरवाल वय- ५३ वर्षे , धंदा- मेडीकल रा . विकास नगर , किवळे , देहुरोड , पुणे यांनी फिर्याद दिली की , नमुद आरोपी यांनी यांनी मेडीकलमध्ये घुसुन पोलीस असल्याचे बतावणी केली व मेडीकलमधील एमटीपी किट व दोन फाईल घेवुन ही औषधे मेडीकलमध्ये ठेवता येत नाही . तुमचेवर ३०२ सारखे गंभीर गुन्हा दाखल होवुन येरवडा जेल येथे जायें लागेल याची धनकी देवुन कारवाईच्या बहाण्याने त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवुन धमकी देवुन हॉस्पिटलचे डॉक्टर यांनाही मारण्याची धमकी देवुन एका तासात ५ ते ६ लाख रुपयांची मागणी केली असल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरुन नमुद छ आरोपीविरुध्द वाकड पो . स्टे गुरनं . ५०६/२०२१ भा.द.वि. कलम ३६४ ( अ ) , ३८५ , ३८७ , १७०.१७१,५०६.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सर्व आरोपींना तात्काळ गुन्हयात अटक करण्यात आली आहे . त्यांना मा . न्यायालय यांचे समक्ष हजर केले असता त्यांची दि .१९ / ०६ / २०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घोण्यात आली आहे . तपासामध्ये यातील आरोपी नं . १ हा टायगर ग्रुपचा पिंपरी चिंचवड अध्यक्ष , आरोपी नं . ६ हा टायगर ग्रुपचा पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष , आरोपी नं . २ हा ग्रामसुरक्षा दलाचा सदस्य , आरोपी नं . ७ हा महाराष्ट्र गृहसुरक्षा रक्षक दलाचा कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले . अधिक चौकशीमध्ये सदर मेडीकलमध्ये फायदा जास्त असल्याने यातील आरोपी नं . ५ कमलेश बाफना याचे सांगण्यावरून त्याला फिर्यादी मास सदर हॉस्पिटलचे मेडीकलमधुन बेदखल करुन स्वत सदर मेडीकल चालवायचे असल्याने त्यांनी आपसात कट रचुन सदरचा गुन्हा केला असल्याचे तपासात निश्पन्न होत आहे . त्या अनुषंगाने सदर गुन्हयात भादंवि कलम १२० ब वाचविण्यात आले आहे . सदर आरोपी यांनी अशा प्रकारे इतर व्यावसायिकांना पोलीस असल्याची बतावणी करुन धमकी देवुन खंडणी उकळली असण्याची दाट शक्यता असुन अशा नागरिकांनी न घाबरता पोलीसांशी संपर्क साधावा असे पिंपरी चिंचवड पोलीसांतर्फ आवाहन करण्यात येत आहे . सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्णाप्रकाश , मा . अपर पोलीस आयुक्त श्री . रामनाथ पोकळे . मा . पोलीस उप आयुक्त परि -२ . श्री . आनंद भोईटे . मा . सहा . पोलीस आयुक्त श्री . श्रीकांत डिसले . मा . वरिष्त पोलीस निरीक्षक श्री . विवेक मुगळीकर यांचे मार्गदर्शनाखाली . पोलीस निरीक्षक गुन्हे १ श्री . संतोष पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे २ श्री . सुनिल टोणपे , सपोनि , श्री . एस . एम . पाटील , सपोनि . श्री . अभिजीत जाधव , पोउनि , श्री . अशोक जगताप . पोलीस अंमलदार विजय वेळापुरे , दिपक भोसले , तात्या शिदे , विक्रम कुदळ , विभीषण कन्हेरकर , बाबाजान इनामदार , बापुसाहेब धुमाळ , राजु काळे , बंदु गिरी , विजय गंभीरे , प्रमोद कदम , नितीन ढोरजे , दिपक साबळे . सुरज सुतार , कालेय खराडे , नितीन गेंगजे . कल्पेश पाटील , प्रशांत गिलबिले यांनी केली . ( आनंद भोईट ) पोलीस उप आयुक्त , परि -२ , पिंपरी चिंचवड आयुक्तालय .

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *