सराईत गुन्हेगारांवर गुन्हे शाखा युनिट २ कडुन मोक्का अंतर्गत कारवाई
ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL
दिनांक १७/०६/२०२१ सराईत गुन्हेगारांवर गुन्हे शाखा युनिट २ कडुन मोक्का अंतर्गत कारवाई
Online portal news
मा . पोलीस आयुक्त , अमिताभ गुप्ता यांनी सराईत जबरी चोरी करणा – या गुन्हेगारांवर वचक ठेवून कठोर कारवाई करण्याच्या सन्चना दिल्या होत्या त्या अनुषंगाने युनिट २ कडुन कारवाई चालु असताना दिनांक ११/०६/२०२१ रोजी पोलीस नाईक चेतन गोरे यांना त्यांचे बातमीदाराकडुन माहीती मिळाली की , हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा राज . न . ४२९ / २०२१ भा.द.वि. कलम ३९२ , ३४१ , ५०६ , ३४ आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे १ ) पुरुषोत्तम ऊर्फ बंडया वीर २ ) संजय ऊर्फ सोन्या भोसले यानीच केला असुन ते हडपसर ससाणेनगर रेल्वे फाटक परिसरात एका दुचाकी गाडीवर येऊन संशयास्पद स्थितीत थांबले आहेत . अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने तात्काळ सहा.पो.निरी . प्रकाश मोरे व स्टाफ असे त्या ठिकाणी जाऊन दोन्ही आरोपींना त्यांचेकडे असलेल्या अॅक्टीवा गाडीसह ताब्यात घेतले . त्यांना नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे (१ ) पुरुषोत्तम ऊर्फ बंडया राजेंद्र वीर वय २५ वर्षे रा . सिध्दार्थ नगर , महालक्ष्मी कॉम्प्लेक्स समोर नांदेडफाटा , सिंहगड रोड पुणे .( २ ) संजय ऊर्फ सोन्या हरीष भोसले वय २१ वर्षे रा . देवाची ऊरळी , हांडेवाडी रोड , ऋतुजा पार्क लेन नं . ४ हांडेवाडी पुणे . अशी असल्याची सांगीतली . त्यांचेकडे तपास करता त्यानी वरील दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्यांना गुन्हयात अटक करुन तपास करता त्यांचेकडुन एकुण १ ,९१,३०० / – रु . मालमत्ता हस्तगत करुन १ ) हडपसर पो.स्टे , गुन्हा रजि . नं . ४२९ / २०२१ भा.दं.वि. कलम ३९२ , ३४१ , ५०६ , ३४ आर्म अॅक्ट कलम ४(२५) ,२ ) सहकारनगर पो.स्टे . गुन्हा रजि . नं . १४४/२०२१ भा.दं.वि. कलम ३८० , ३४ व ३ ) सिंहगड रोड पो.स्टे . गुन्हा रजि . नं . २३८/२०२१ भा.दं.वि. कलम ३७९ , ३४ , असे तीन गुन्हे ऊघडकीस आले . आरोपींचे पुर्वीचे गुन्हेगारी अभिलेख पहाता त्यांचेवर खालील प्रमाणे दरोडा , जबरी चोरी , घरफोडी चोरी , वाहन चोरी व शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत . पुरुषोत्तम ऊर्फ बंडया राजेंद्र वीर याचेविरूध्द दाखल असलेले गुन्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर व कलम चिखली १०१ / २०१९ भा.द.वि. ३९ ५ आर्म अॅक्ट ४ ( २५ ) निगडी | २५/२०१८ भा.द.वि. ३९२ . येरवडा | ७१९ / २०१६ भा.द.वि. ३७७ , ३२३ , ५०६,३४ चंदननगर ११४२/२०२० भा.द.वि. ३८०.५११,३४
चंदननगर ९१३ / २०२० भा.द.वि. ३५७,३८०,३४
सोन्या ऊर्फ संजय हरीष भोसले याचेविरूध्द दाखल असलेले गुन्हे अ.क्र . पोलीस स्टेशन जिस्टर नंबर व कलम
(१)निगडी २५/२०१८ भा.द.वि. ३९२ ,३४
(२) हडपसर ३७७/२०१५ भा.द.वि. ३९४ , ३४१ , ३४
(३) येरवडा गुन्हा ,७१९ / २०१६ भा.द.वि. ३७७ , ३२३ , ५०६,३४
(४) हडपसर ६८८ /२०१४ भा.द.वि. ३९५ , ३२३,४२७ आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ).
(५) हडपसर ७६६/२०१७ भा.द.वि. ३२६,३४
(६) हडपसर २६८/२०२० भा.द.वि. ३७९,३४
(७) हडपसर ११६७/२०२० भा.द.वि.क. ४५७ , ३८० , ५११ , ३४
आरोपींचे गुन्हेगारी अभिलेखावरुन त्यांच्याविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या सुचना पोलीस उप आयुक्त श्री श्रीनिवास घाडगे यांनी दिल्या . आरोपींचे गुन्हेगारी अभिलेखा बाबतचे रेकॉर्ड , त्यायालयातुन प्राप्त . करुन घेऊन पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर यानी मोक्का कारवाई करण्यास मंजुरी मिळणेबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री अशोक मोराळे याना सादर केला . त्यांनी मोक्का अंतर्गत प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देऊन आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) . ३ ( २ ) , ३ ( ४ )
लावण्यात आले आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त , श्री सुनिल पवार हे करीत आहेत . सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त , श्री अभिताभ गुप्ता साो , मा.सह पोलीस आयुक्त श्री रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त , श्री अशोक मोराळे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री श्रीनिवास घाडगे , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री सुरेंद्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप , सहा.पो निरी . प्रकाश मोरे , चेतन गोरे , सपोफौ यशवंत आंब्रे , पोलीस अंमलदार किशोर वग्गु , संजय जाधव , अस्लम पठाण चंद्रकांत महाजन , ऊत्तम तारु , निखील जाधव , समिर पटेल , गोपाळ मदने यांनी केली आहे
CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526