फरासखाना पोलीसांकडुन दुचाकी गाडया चोरणा – या सराईताकडुन तीन दुचाकी गाडया जप्त करुन तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेबाबत

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL

फरासखाना पोलीसांकडुन दुचाकी गाडया चोरणा – या सराईताकडुन तीन दुचाकी गाडया जप्त करुन तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेबाबत

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL

फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढले असल्यामुळे फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक , मा . राजेंद्र लांडगे , व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) राजेश तटकरे यांनी फरासखाना पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग यांना पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये वाहन चोरी गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी पेट्रोलिंग करुन वाहन चोरांचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते . त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग व तपास पथकातील पोलीस स्टाफ फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना फिरत फिरत बुधवार पेठ , जगोबादादा तालीम समोर त्यांना एक संशयित इसम दुचाकी गाडी क्रमांक MH12.AH.8547 यावरुन फिरत असताना मिळुन आल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेवुन त्याचीकडील गाडीबाबत तपास केला असता त्यागाडीबाबत फरासखाना पोलीस स्टेशनगुरनं १०३/२०२१ भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले . त्यानंतर सदर आरोपीकडे पोलीस उप निरीक्षक , नरेश वाडीवाले यांनी अधिक तपास करता त्याने फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि १०२/२०२१ भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे मधील अॅक्टीव्हा दुचाकी गाडी क्रमांक MH12.HX.0352 ही , तसेच फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि ०३/२०२० भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे मधील अॅक्टीव्हा दुचाकी गाडी क्रमांक MH12.FX2361 ही गाडी चोरी केली असल्याची कबुली दिली असुन त्याचेकडुन सदरच्या दुचाकी गाडया जप्त करुन फरासखाना पोलीस स्टेशनकडील तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत . तसेच सदर आरोपीताचा पुत् अभिलेख तपासणी केली असता त्याचेवर यापुर्वी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे दाखल असल्याची माहीती समजली आहे . सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता साो , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे साो , मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर , डॉ.संजय शिंदे साो , मा . पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे डॉ.प्रियंका नारनवरे , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शना खाली फरासखाना पोलीस स्टेशनचे श्री.राजेंद्र लांडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , राजेश तटकरे , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) , मनोज अभंग सहाय्यक पोलीस निरीक्षक , नरेश वाडीवाले पोलीस उप निरीक्षक , पोलीस अंमलदार , अभिनय चौधरी , सयाजी चव्हाण , मेहबुब मोकाशी , सचिन सरपाले , गौस मुलाणी , वैभव स्वामी , राकेश क्षीरसागर , रिजवान जिनेडी , मोहन दळवी , महंमद हनीफ शौकत शेख , मयुर भोकरे , अमोल सरडे , यांच्या पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *