१७ सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणी करुन चप्पल चोरी करणारे तीन आरोपीला खडकी पोलीस स्टेशनकडुन अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक २२/०५/२०२३ (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
१७ सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणी करुन चप्पल चोरी करणारे तीन आरोपीला खडकी पोलीस स्टेशनकडुन अटक.
दि. १९/०५/२०२३ रात्रौ २१/०० वा. ते दि. २०/०७/२०२३ सकाळी ०८/०० वा. दरम्यान सुनिल बारचे वर द मुस्लीम को ऑपरेटीव्ह बँकेचे समोर, खडकी बाजार, पुणे येथील चप्पलचे गोडावुन चे कडी व कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करुन रु. ३००००/- किंमतीचे चप्पल चोरी केलेबाबत फिर्यादी नामे, हरेश श्रीचंद अहुजा, वय ३८ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. आंबेडकर कॉलनी, रेव्हा रोड, पिंपरी पुणे यांनी फिर्याद दिलेवरुन खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १५७ / २०२३ भा.द.वि. कलम. ४५४,४७७,३८० अन्वये दाखल आहे.
यातील अज्ञात आरोपीचे शोध घेणेकामी तपासपथक प्रभारी पोलीस उप निरीक्षक वैभव मगदुम व तपासपथक स्टाफ असे एकुण १७ सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणी करुन सदर गोडावून फोडणारे आरोपी निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेवुन सदर इसमांना अटक करण्यात आलेली आहे.
सदर आरोपीचे नावे अनुक्रमे १) सागर दत्ता चांदणे, वय २३ वर्षे, महादेववाडी, खडकी पुणे. २) आकाश विक्रम कपुर, वय २२ वर्षे, रा, सदर ३) अरबाज जाफर शेख, वय २१ वर्षे, रा. सदर असे आहे. त्यांना दाखल गुन्हयाचेकामी दि. २१/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली असुन सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उप निरीक्षक, वैभव मगदुम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. रंजनकुमार शर्मा साो, अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ ०४, पुणे शहर, मा. आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्री. विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे पोउप निरीक्षक वैभव मगदुम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, सपोफौ तानाजी कांबळे, पो. ना. निकाळजे, पो.ना. कलंदर, पो.ना. शेख, पो.शि. अनिकेत भोसले, पो.शि. ऋषिकेश दिघे. यांनी केलेली आहे.
(विष्णु ताम्हाणे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad