सराईत गुन्हेगाराकडून ५,२५,००० / – रुपये किंमतीचा २१ किलो गांजा हस्तगत केला –

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय

दि . २१/०८/२०२१ एमआयडीसी भोसरी पोलीसांनी सराईत गुन्हेगाराकडून ५,२५,००० / – रुपये किंमतीचा २१ किलो गांजा हस्तगत केला –

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक १७/०८/२०२१ रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनकडील अंमलदार नितीन खेसे यांना गोपणीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की आंमत्रण हॉटेल समोरील मोकळया जागेत , ९० फुटी रोड , मोशी पुणे एक इसम होंडा शाईन गाडी नंबर एमएच १२ –एसएस ३५२३ मोटारसायकलवर उभा असुन त्याचे मोटार सायकलवर बांधलेल्या प्लॉस्टीक गोणीमधे गांजा आहे अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन यांना कळविली असता त्यांनी बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील , तपास पथकाचे अधिकारी सचिन चव्हाण व तपास पथकाचे अंमलदार असे आंमत्रण हॉटेल समोरील मोकळ्या जागेत , ९० फुटी रोड , मोशी पुणे येथुन इसम नामे संजय सदाशिव मोहीते वय ४० वर्ष रा . एकता कॉलनी , स / नं २०९ , दत्त मंदीरा शेजारी , शास्त्री चौक , भोसरी पुणे यांस ताब्यात घेवुन त्याचेकडुन ५,२५,००० / – रुपये किंमतीचा २१ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे . दाखल गुन्हयातील आरोपीस दि .१८ / ०८ / २०२१ रोजी अटक करुन मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीची दि .२१ / ०८ / २०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडीची रिमांड मंजूर केली आहे .

सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त , श्री कृष्ण प्रकाश साो . मा.अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे साो . मा.पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) श्री.सुधीर हिरेमठ , मा.पोलीस उपायुक्त मंचक इप्पर साो . परि -०१ , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.डॉ.सागर कवडे साो . MIDC भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . शिवाजी गवारे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) प्रदिप पाटील , तपास पथकातील पोलीस उप – निरीक्षक सचिन चव्हाण , पोलीस हवालदार शरद गांधिले , पोलीस अमंलदार , अनिल जोशी , करन विश्वासे , रहीम शेख , नितिन खेसे , विशाल काळे यांनी केली आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण हे करीत आहेत .

( मंचक इप्पर ) पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ , पिंपरी चिंचवड

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *