बनावटआधार कार्ड बनविणारा सराईत गुन्हेगार व गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास पोलीसांनी केले जेरबंद .

दि . २३/०८/२०२१ समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची दुहेरी कामगिरी , बनावट आधार कार्ड बनविणारा सराईत गुन्हेगार व गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास पोलीसांनी केले जेरबंद

दि . २०/०८/२०२१ रोजी समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे हद्दीत प्रट्रोलींग करीत असतांना तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा गाडीच्या आरटीओ नंबरच्या आधारे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना तो त्याचे रहाते घरी मिळून आला . त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव

विनायक राजू पूजारी , वय २७ वर्षे , रा . स.नं. ६६ , डोबर वाडी , घोरपडीगांव , पुणे

असे असल्याचे सांगितले . त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दि . १९ / ०८ / २०२१ रोजी फिर्यादी हे दारुवाला पुल चौक येथे सकाळी १०/०० वा . नायडु स्टोअर्स जवळ असलेल्या इडली वडा सेंटर येथे नाष्टा करीत असताना गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे शर्टचे खिशातील मोबाईल फोन चोरी केले बाबत सांगीतले . सदरचा मोबाईल व अॅक्टीवा गाडी गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आली आहे . सदर बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुरनं . १४६/२०२१ भादविक . ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . तसेच समर्थ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा र.नं. ६१५/२०२० भादविक . ४२०,४१९ , ४६५,४६७,४६८,४६९ , ४७२,३४ मधील एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नामे रणजित बबन खेडेकर , वय ३५ वर्षे , रा . खेडेकर मळा , ऊरुळी कांचन पुणे यास अटक केली आहे . तो बनावट आधार कार्ड अगदी सहजरीत्या बनवून देतो व सदरच्या गुन्हयामध्ये बनावट आधार कार्डचा वापर झालेला असून ते बनावट आधार कार्ड रणजित खेडेकर यानेच बनवून दिले आहे . सदरचा पाहिजे आरोपी हा मागील एक वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत होता व पत्ता बदली करून रहात असलेने मिळून येत नव्हता . सता त्या .

सदरची कामगिरी ही मा . डॉ . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ पुणे शहर , मा . श्री . सतिश गोवेकर , हाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे श्री . विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , श्री . उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक , संदीप जोरे , सपोउपनिरी सतिश भालेराव , पोलीस अंमलदार सुशील लोणकर , संतोष काळे , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , सुमित खुट्टे , सुभाष मोरे , निलेश साबळे , विठ्ठल चोरमले , महेश जाधव , रिकी भिसे यांनी केली आहे .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सिमर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *