घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार युनिट -२ कडुन जेरबंद
ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक -२०/०८/२०२१ गुन्हे शाखा , युनिट २ पुणे शहर घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार , गुन्हे शाखा , युनिट -२ कडुन जेरबंद
ONLINE PORTAL NEWS
पुणे शहरामध्ये घरफोडीच्या गुन्हयामध्ये वारंवार वाढ होत असल्याने , रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पाळत ठेवण्याचे मा.वरीष्ठानी आदेश दिले होते . त्या अनुषंगाने दिनांक १५/०८/२०२१ रोजी सहा.पोलीस निरीक्षक वैशाली भोसले , पो.हवा . ३६४ वग्गु , पो.ना. २४६ तारु , पो.शि .८४०३ गजानन सोनुने , पो.शि. ८१३६ जाधव , पो.शि .१०७४३ शेख , पो.शि .१२०३४ चोरमोले , पो.शि .८३०९ पटेल असे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग फिरत फिरत कात्रज चौक येथे आलो असता , पोलीस अमंलदार गजानन सोनुने यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , घरफोडी चोरी करणारे दोन इसम शेलार मळा कात्रज पुणे येथे थांबले असुन , त्यांचेकडे एम.एच.१६ सी.एन .०२६९ नंबरची मोटार सायकल आहे . अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी युनिट २ प्रभारी मा . पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना कळविली असता त्यांनी खात्रीकरुन कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले . लागलीच आम्ही स्वतः वरील स्टाफसह शेलार मळा कात्रज पुणे या ठिकाणी जावुन गुप्तपणे पहाणी करीत असताना दोन इसम मोटार सायकल नं . एम.एच. – १६ / सी.एस. – ०२६९ जवळ थांबलेले दिसले ते आंम्हास पाहुन पळुन जावु लागल्याने आम्ही त्यांना वरील स्टाफच्या मदतीने पकडुन ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारता त्यांनी ते दोघे सख्खे भाऊ असुन त्यांची नावे १ ) युवराज अर्जुन डोणे वय २६ वर्षे , रा . मु.पो. मिरजगांव , कवडेवस्ती , ता.कर्जत , जि.अहमदनगर २ ) अविनाश अर्जुन डोणे वय २१ वर्षे , रा . सदर अशी असल्याचे सांगीतले . त्यांना विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता , त्यांनी भागात मागील १५ दिवसापुर्वी घरफोडी चोरी केल्याचे सांगीतले . सदर घरफोडी चोरी बाबत भारती विदयापीठ पो.स्टे . कडील रेकॉर्डची पहाणी केली असता भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ५४३/२०२१ भादविक ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन , त्यांचेकडे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये अधिक तपास केला असता , त्यांनी भारती विद्यापीठ पो.स्टे . ४ , अलंकार , लोणीकंद , नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येकी १ असे एकुण ७ गुन्हे केल्याची कबुली दिली असुन , त्यांचे ताब्यातुन २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने , गुन्हयात वापर केलेली मोटार सायकल , कटवणी / छन्नी चाव्यांचा जुडगा असा सर्व मिळुण ९ , ४०,०५० / – रु किमंतीचा माल जप्त करण्यात आला असुन , चोरीचे सोने खरेदी करणारा अहमदनगर येथील सोनार नामे निलेश कुंदनमल झाडमुथ्था वय ३८ वर्षे , रा . मु . पो . डोंगरगण , ता . आष्टी जि . बीड यास देखील अटक करण्यात आले आहे . यातील अटक आरोपी बारामती अहमदनगर , श्रीगोंदा येथील पोलीस स्टेशन येथील एकुण १० घरफोडी चोरीच्या गुन्हयामध्ये पाहीजे आरोपी आहेत . नमुद आरोपी हे पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असुन , त्यांचेकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . सदर आरोपी हे दुचाकीचे नंबर प्लेटला चिखल लावुन , अगोदर बंद घराची पाहाणी करुन , डुब्लीकेट चावी अन्यथा कटावणीचे सहाय्याने कडी कोयंडा तोडुन घरफोडी चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे .
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त , श्री.अशोक मोराळे , पोलीस उप – आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , सहा.पो.आयुक्त श्री.सुरेद्रं देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , क्रांतीकुमार पाटील , गुन्हे शाखा , युनिट २.पुणे शहर , सहा.पो.नि.वैशाली भोसले , सहा.पो.फौज.यशवंत आंब्रे , पोलीस अमलंदार गजानन सोनुने , कादीर शेख , संजय जाधव , किशोर वग्गु , निखील जाधव , समिर पटेल , चंद्रकांत महाजन , उत्तम तारु , मितेश चोरमोले , गोपाल मदने , नामदेव रेणुसे , मोहसीन शेख , चेतन गोरे , यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CRIME REPORTER RAEES KHAN
9881888008