जादुटोनाची भिती दाखवून महीलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबास अटक.

ACS POLICE CRIME SQUAD

जादुटोनाची भिती दाखवून महीलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबास अटक.

वाकड पोलीसांची कारवाई.

क्राईम रिपोर्टर- युनूस खतीब पिंपरी-चिंचवड

मा .श्री . कृष्ण प्रकाश सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांनी महीला अत्याचार बाबत झिरो टॉलरन्स अंतर्गत कारवाई करणेबाबत दिलेल्या सुचना प्रमाणे .

डॉ विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या अधिकारी व अंमलदार यांना सदरबाबत सुचना दिल्या होत्या . दि .२१ / १२ / २०२१ रोजी यातील पीडीत महीला हीने तक्रार दिली की ,

इसम नामे विलास पवार ऊर्फ महाराज , पाटोदा , बीड याने त्याचे मोबाईल वरून फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर कॉल करुन पीडीत मही पतीने त्यांना कंबरेच्या खाली पांगळे करण्याकरीता सांगितले असून त्यांचे व त्यांचे पतीचे नियमीत होणारे भोडणे याबाबत त्याला माहीत असल्याचे सांगत पीडीत महीलेच्या पोटात २ ते ३ गाठी असल्याचे सांगनू पीडीत महीलेचे आयुष्य थोडेच राहीले आहे असे सांगून भिती दाखवून फिर्यादीला वारंवार फोन करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर इसम नामे विलास पवार ऊर्फ महाराज याने फिर्यादीला सांगितले की ज्या माणसाच्या उजव्या हाताचे तळहातावर व गुप्तांगावर तीळ आहे. त्याच्याशी तुम्ही शारीरीक संबंध ठेवले तर तुम्हाला कोणीही काही करू शकरणार नाही असे सांगितले . त्यानंतर त्याने स्वताचा एक अश्लिील व्हीडीओ पाठवून त्यात उजवे हातावरील तीळ व गुप्तांगावरचे तीळ दाखवले होते.

सदरचा व्हीडीओ पाठविल्यानंतर पुन्हा पीडीत महीलेला कॉल करून तीचेकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच फिर्यादीला माझेशी शरीरसंबंध ठेवले तर तुमचे सगळे कुटूंब सुखी राहील.

तुम्हाला तुमचे कुटूंब सुखी ठेवायचे असेल तर माझेशी शरीरसंबंध ठवा असे म्हणून वारंवार शरीरसुखाची मागणी करून पीडीत महीलेचे मनात लज्जा उत्पन्न केली म्हणून वाकड पोलीस स्टेशन येथे गुरनं .१०८१ / २०२१ भादवि कलम ३५४ ( ड ) , २९२ , ५०० , ५०९ , माहीती तंत्रज्ञान अधिनीयक २००८ चे कलम ६७ ( ए ) , नरबळी आणि इतर अमानुष , अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

घटनेचे गार्भीय ओळखुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री संतोष पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सपोनि अभिजीत जाधव यांना गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक करणे बाबत आदेशीत केले . सपोनि अभिजीत जाधव यांनी फिर्यादी महीलेशी संपर्क साधून त्यांचे मदतीने दि .२५ / १२ / २०२१ रोजी आरोपीला पकडण्यसाठी डांगे चौक येथे सापळा रचला व सपोनि अभिजीत जाधव , पोलीस अंमलदार सपोफौज कन्हेरकर , पोहवा साबळे व इतर अंमलदार यांनी शिताफिने आरोपीस ताब्यात घेतले.

त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.

सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर हे अधिक तपास करीत असून आरोपी नामे विलास बापूराव पवार ऊर्फ महाराज , वय ४१ वर्षे , रा . मु.पो. पिंपळवंडी , ता . पाटोदा , जिल्हा बिड याला दि .२८ / १२ / २०२१ रोजी पर्यन्त पोलीस कस्टडीची रिमांड मिळाली आहे.

गुन्हयाचा तपास चालु आहे.

सदरची कारवाई मा . श्री कृष्णप्रकाश सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . डॉ संजय शिंदे सो , अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मा . श्री आनंद भोईटे सो , पोलीस उप आयुक्त परि २ , पिंपरी चिंचवड , मा . श्री श्रीकांत दिसले , सहा.पोलीस आयुक्त सो , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री . संतोष पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे , सपोनि श्री . अभिजीत जाधव , सपोनि श्री संतोष पाटील , पोउपनि श्री गणेश तोरगल , पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर , दिपक साबळे , दिपक भोसले , भास्कर भारती , कल्पेश पाटील यांनी मिळुन केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *