पुणे रेल्वे स्टेशन,७ महिन्यांच्या बाळाचे अपहरण केले.सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसत आहे.apcs.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे, दि.२७ :- रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ वरून पुण्याला सासूला भेटण्यासाठी आलेले असताना भेटून झाल्यानंतर परत रेल्वेची वाट बघत असताना रेल्वे स्थानकावर झोपले. त्यावेळेस पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रावण अजय तेलंग असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अजय तेलंग बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दाम्पत्य मूळचे भुसावळचे आहे. सासूला भेटण्यासाठी तेलंग आणि त्याची पत्नी पुण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंग दाम्पत्य झोपले होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा सात महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली. तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. तेलंग दाम्पत्याने त्याचा शोध घेतला. तेव्हा तो सापडला नाही.

त्यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तातडीने स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चित्रीकरणात सात महिन्यांच्या श्रावणचे अपहरण करणारी व्यक्ती आढळून आली.

पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. स्टेशन परिसरातील रिक्षाचालक, उपहारगृहचालक, फेरीवाल्यांकडे चौकशी करण्यात आली आहे. अपहृत बालकाची माहिती मिळाल्यास त्वरीत सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे (मोबाइल क्रमांक- ९४२२४२७८४७), पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड (मोबाइल क्रमांक- ९०११२७०५०५), ज्ञाना बडे (मोबाइल क्रमांक – ९६६५०६३०३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *