मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस कर्मचार्‍याविरूद्ध. ऍण्टी करप्शन कारवाई .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुण्यात गुन्हे शाखेच्या युनियुनिट ३ चे पोलीस कर्मचार्‍याविरूद्ध ऍण्टी करप्शन कारवाई : २ लाखांची मागणी.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुण्यात गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचार्‍याला २ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून खडकी पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलीस कर्मचार्‍यासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट-३ कडील पोलीस कर्मचारी दीपक क्षिरसागर यांच्या विरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आले होते. त्यात त्याला आरोपी न करणे व अटक न करणे यासाठी पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर याने २ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. क्षीरसागर याने २ लाख रुपयांपैकी ३० हजार रुपये साळवी याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर खडकी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचला. तक्रारदाराकडून सिमोन साळवी याने ३० हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्यानंतर क्षीरसागरलाही ताब्यात घेण्यात आले.

शासकीय अधिकारी , कर्मचारी / लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ साधण्याचे आवाहन श्री . अमोल तांबे , पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

Web Title :- Pune ACB Trap | .a-bribe-of-rs-2-lakh-against-a-unit-3-police-officer-of-the-crime-branch-for-not-registering-a-case-of-mobile-theft-anti-corruption-action

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *