अरे बापरे:- कोर्टातील वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे,दि.०२/१२/२०२२ :-शिवाजीनगर न्यायालयातील केसमधून सुटका करण्यासाठी न्यायाधीशांना सांगून मदत करण्यासाठी व निकाल मार्गी लावण्यासाठी २ लाखांची लाच मागून त्यापैकी दीड लाख रुपये लाच स्वीकारताना शिवाजीनगर न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले.

पडताळणी दिनांक : ३०/११/२०२२ सापळा दिनांक : दि . ०१/१२ /२०२२ सापळा ठिकाण : – शिवाजीनगर न्यायालयाचे बाहेरील रस्त्यावर झेरॉक्स दुकानाचे समोर थोडक्यात माहिती :

सचिन अशोक देठे (वय ३९, रा. राजगुरुनगर, खेड- असे या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील गणेश झेरॉक्स या दुकानासमोर गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता ही कारवाई करण्यात आली.

यातील तक्रारदारांचे मावसभावाचे विरूद्ध दाखल असलेल्या खून व मोका केसचा | खटला सत्र न्यायालय , शिवाजीगनर पुणे येथे सुरू असून खटल्याच्या साक्षीचे जाबजबाब टायपिंग क आवश्यक ते बदल करून त्या केसमधून सुटकेसाठी मदत करतो असे सांगून वरिष्ठ लिपिक सचिन देठे यानी १०,००,००० / – रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली . सदर तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक वरिष्ठ लिपिक सचिन देठे यानी २,००,००० / लाख रूपयांची लाचेची मागणी केली व त्यापैकी १,५०,००० / – रूपये स्वीकारल्यावर ताब्यात घेण्यात आले असून वरिलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्योती पाटील अधिक तपास करीत आहेत.


ला . प्र . वि . पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील तपास करत आहेत . सदरची कारवाई मा . पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक श्री .अमोल तांबे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र , मा .अपर पोलीस अधीक्षक श्री .सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली .

शासकीय अधिकारी , कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री .अमोल तांबे , पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *