लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मोठी कारवाई; सापळा रचून लाच घेताना तहसीलदारास रंगेहात पकडले.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

४२ लाख रूपयांचे लाच प्रकरण ! तत्का. तहसीलदार रंजना उमरहांडे, महसूल सहाय्यक स्वाती शिंदे, तलाठी सरफराज देशमुखसह ५ जणांवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई, जाणून घ्या प्रकरण.

हायलाइट्स:

  • तहसीलदाराला एसीबीने रंगेहात पकडले.
  • ४२ लाख रूपयांचे लाच प्रकरण घेताना सापळा रचून पकडले.
  • ट्रस्टच्या जागेचा एन.ए. (अकृषक प्रमाणपत्र) प्रस्ताव मंजूर करण्यासाठी.लाच मागितल्या .

१ ) रंजना उमेश उमरहांडे , पद तत्कालीन तहसीलदार , शिरूर ( वर्ग -१ ) २ ) स्वाती सुभाष शिंदे ,पद- महसूल सहाय्यक , तहसिलदार कार्यालय शिरूर ३ ) सरफराज तुराब देशमुख , पद- तलाठी मौजे शिरूर खाजगी इसम :४ ) अतुल घाडगे ,५ ) निंबाळकर . ४२,००,००० / – ( बेचाळीस लाख रूपये )

पुणे :   ट्रस्टच्या जागेचा एन.ए. (अकृषक प्रमाणपत्र) प्रस्ताव मंजूर करण्यासाठी व वरिष्ठ कार्यालयातून मंजूरी आणण्यासाठी तलाठयाने त्याच्यासाठी व वरिष्ठांसाठी तब्बल ४२ लाख रूपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तलाठयास पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह तत्कालीन तहसीलदार आणि इतरांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर येथील तत्कालीन तहसीलदार रंजना उमेश उमरहांडे, शिरूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक स्वाती सुभाष शिंदे, तलाठी सरफराज तुराब देशमुख, खासगी व्यक्ती अतुल घाडगे आणि निंबाळकर यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने तलाठी सरफराज देशमुख याला ताब्यात घेतलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचा एन.ए. प्रस्ताव मंजूर करावयाचा होता. त्यासाठी तलाठी देशमुखने त्यांच्याकडे ४२ लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली.

सदरील जागेचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व जिल्हाधिकारी कार्यालयात मदत करण्यासाठी रंजना उमरहांडे यांनी ५ लाख रूपये तर स्वाती शिंदे यांनी १ लाख रूपयाची मागणी केली. आरोपी घाडगे आणि निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूरी मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी २० लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराकडून अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदरील तक्रारीची दि. २५ मे २०२२ ते दि. १९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वजण लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आज (सोमवार) दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाचही जणांविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय अधिकारी , कर्मचारी / लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ साधण्याचे आवाहन श्री . अमोल तांबे , पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

Web Title :- Pune ACB Trap | A major action by the Anti-Corruption Department; Tehsildar was caught red-handed while taking bribe by laying a trap.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *