वकील महिलेची तक्रार घेण्यास कोंढवा पोलिसांना टाळाटाळ :

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

कोंढवा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश.

वकील महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी माध्यमांवर बदनामी. , मारहाणीची होती तक्रार.

एका पीडित वकील महिलेचे विनयभंग केल्याप्रकरणी तसेच खंडणी, घरात घुसून मारहाण करून सोशल मीडिया वरती बदनामी केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे पीडित महिलेने एड साजिद ब शाह यांच्या मार्फत मे कोर्टात केस दाखल केली होती मे कोर्टाने दखल घेऊन कोंढवा पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत….दिनांक 8/8/2022

न्यायालयाचे वकीलपत्र सोडण्यासाठी दबाव टाकून विनयभंग करत खंडणीची मागणी केल्याची तक्रार घेण्यास • पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयाने कोंढवा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे .

कॅन्टोन्मेंट प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.एन ऑडारे यांनी हे आदेश दिले आहेत .

तसेच त्यांच्या घराच्या भिंतीवर पत्र चिकटवून ३० हजारांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याचे म्हटले . त्यावर न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले आहेत.

वसीम इकबाल खान ( ३५ ) , नदीम सय्यद ( ३५ ) , भरत जाधव ( ५८ ) आणि अतिका नदीम सय्यद ( ३२ सर्व रा . सनशाईन हिल्स , पिसोळी गाव ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

या प्रकरणात १५६ ( ३ ) नुसार खासगी तक्रार अॅड . साजिद शाह , अॅड . अमित मोरे यांच्यामार्फत दाखल केली होती . अॅड साजिद शाह यांनी सांगितले तक्रारदार महिला ही वकील असून सोसायटीमधील सहभागी गैरव्यवहारात असलेल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी तक्रारदार महिलेची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक केली होती .

याबाबत संशयित आरोपींना समजल्यानंतर त्यांनी तक्रारदारावर व त्यांच्या परिवाराला मानसिक , शारीरिक त्रास देत कायदेशीर मदत न करण्याची धमकी दिली . परंतु आरोपीच्या कोणत्याही दबावाला त्या बळी पडल्या नाहीत . त्यांच्यावर पाळतही ठेवली जात असल्याने त्यांनी याबाबत संशयितांना विचारणा केली . त्यावेळी यातील एकाने मी एका गँगचा सदस्य असल्याचे सांगत ही केस सोडण्याची व तिचे अपहरण करण्याची धमकी दिली .

तक्रारदार महिलेकडे धमक्या दिलेल्याचे रेकॉर्डिंग होते . ते त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात दाखवूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही . तक्रारीची वरिष्ठांनीदेखील दखल घेतली नाही . त्यानंतर १६ जानेवारी रोजी आरोपीपैकी एकाने अपमानजनक व अश्लील शब्द वापरून फिर्यादीचा विनयभंग केला . तसेच प्राणघातक हल्ला केल्याचेही न्यायालयीन तक्रारीत म्हटले होते . ९ फेब्रुवारीला त्यांच्या पतीलाही मारहाण करण्यात आली . फेसबुक , यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही बदनामी केली . त्यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीही तोडून टाकले , दरवाजा तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे व पैसे मागत असल्याचे तक्रारीत म्हटले होते .

पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *