मुंढव्यातील हॉटेल मध्ये दारूच्या नशेत हॉटेलमध्ये राळा केले व पुणे शहर पोलिस दलातील ३ कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे : दि. २१: नोव्हेंबर २०२२:(ACS NEWS)

दारूच्या नशेत हॉटेलमध्ये राळा केले व

मुंढव्यातील हॉटेल मेट्रोमध्ये डांगडिंग करणार्‍या आणि दारूच्या नशेत झिंगलेल्या पुणे शहर पोलिस दलातील ३ पोलिस कर्मचार्‍यांवर मुंढवा पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम 323, 504, 506 सह मुंबई दारूबंदी अधिनियम कलम – 85(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील ३ पोलिस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

उमेश मरीस्वामी मठपती (29, पोलिस अमंलदार ब.नं. 2581, नेमणुक – फरासखाना पोलिस स्टशेन. रा. सदानंद नगर, सोमवार पेठ), अमित सुरेश जाधव (37, पोलिस अंमलदार ब.नं. 6939, नेमणुक – समर्थ वाहतुक विभाग, पुणे शहर. रा. भवानी पेठ, पोलिस लाईन, पुणे) आणि योगेश भगवान गायकवाड (32, पोलिस अंमलदार ब.नं. 9836, नेमणुक – चंदननगर पोलिस स्टेशन. रा. मातोश्री बिल्डींग, गणपती मंदिर समोर, लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे)

अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात कुनाल दशरथ मद्रे (27, धंदा – मेट्रो लॉऊज हॉटेल मॅनेजर, रा. आगवाली चाळ, लेन नं. 3, गणपती मंदिर बाजुला, घोरपडीगाव) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्री 1.15 वाजता फिर्यादी मद्रे हे ए.बी.सी. रोड, कपिता मॅट्रीक्स बिल्डींग येथील हॉटेल मेट्रो हे हॉटेल बंद करून आवरा आवरीचे काम करीत होते.
त्यावेळी पोलिस अंमलदार उमेश मठपती, अमित जाधव आणि योगेश गायकवाड हे हॉटेलमध्ये आले.
त्यांनी बार काऊन्टरवर दारू पिऊन आणखी दारू मागणी केली.
तसेच त्यांनी रोहित काटकर याला हाताने मारहाण करून मोठ मोठयाने शिवीगाळ केली.
धमकी देऊन हॉटेलमधील बार काऊंटरवर दारू पिऊन धिंगना केला.
घटनेची माहिती समजल्यानंतर मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे ,पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे
आणि उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पुण्यातील ३ पोलिस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आश्विनी भोसले करीत आहेत..

Web Title :- Pune Crime | A case has been registered against 3 police of Pune city who were drunk in Hotel Metro in Mundhwa.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *