सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मेफेड्रॉन एम.डी.व चरस हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांची कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सिंहगड रोड: सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मेफेड्रॉन व चरस हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे, दि.20 नोव्हेंबर.22 (ACS NEWS)


सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मेफेड्रॉन व चरस हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक.

अंमली पदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांची कामगिरी.

सिंहगड रोड पोलीस हद्दीतील सुरु असलेल्या अंमली पदार्थ विक्री रॅकेटला अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरुंग लावण्यात आला असून दोघांना सुमारे दोन लाख रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

दिनांक १९/११/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक -१ चे पोलीस अधिकारी व स्टाफ असे सिंहगड रोड पो स्टे कार्यक्षेत्रात ब्रम्हा हॉटेल चौकातुन रामनगरकडे जाणा-या सार्वजनिक रोडवर पेट्रोलिंग करीत असताना, अखिल ओमकार मित्र मंडळ गणेश मंदिरा समोरील सार्वजनिक रोडवर इसम नामे

१) आकाश महेंद्र ठाकर, वय २२ वर्षे, रा. सनसिटी, आनंदनगर हिंगणे, पुणे

२) अनिकेत जनार्दन धांडेकर, वय-२० वर्षे, रा. आनंद विहार कॉलनी नं. १, सिंहगड रोड, हिंगणे खुर्द, पुणे

या आरोपींपैकी आकाश ठाकर याने त्याचे ताब्यात ४७,६५०/- रु किचे ४७ ग्रॅम ६५० मिलीग्रॅम चरस हा अंमली पदार्थ एक मोबाईल हॅण्डसेट १०,०००/- चे एक पॅशन प्लस दुचाकी क्रमांक क्र. एमएच /१२/ इके /००३७ किरू २०,०००/- असा ७७६५०/- रु किया व अनिकेत घांडेकर याचे ताब्यात ८६,४००/- रु किंचा ०५ ग्रॅम ७६० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व एक आयफोन किरू ५०,०००/- रु किचा १,३६,४००/- असा एकुण २,१४,०५०/- रू किचा ऐवज व अंमली पदार्थ संगनमताने अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.

सदरचा मेफेड्रॉन (एम.डी.) व चरस हा अंमली पदार्थ त्यांनी दोन अज्ञात इसमांकडुन विकत घेवुन त्याची पुणे शहरामध्ये विक्री करीता घेतला असल्याचे त्यांचेकडे करण्यात आलेल्या चौकशी मध्ये आदुळन आल्याने त्यांचेवर तसेच इतर दोघांविरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४८४/२०२२. एन.डी.पि.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) ii (अ), २१ (ब), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे..

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री . अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त श्री . संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . अमोल झेंडे , सहा पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – १ , गुन्हे शाखा , पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड , सहा . पोलीस निरीक्षक , लक्ष्मण ढेंगळे , शैलजा जानकर , पोलीस अंमलदार , सुजित वाडेकर , मनोजकुमार साळुंके , विशाल दळवी , पांडुरंग पवार , संदिप शिर्के , राहुल जोशी , प्रविण उत्तेकर , मारुती पारधी , सचिन माळवे , संदेश काकडे , रेहाना शेख , नितेश जाधव , योगेश मोहिते यांनी केली आहे .

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *