४ हजार रुपये लाच घेताना एका महिला पर्यवेक्षिका अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

लाच घेताना महिला अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात.

दिनांक :- दि. १३/०१/२०२३.थोडक्यात माहिती :-

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

यातील तक्रारदार व लोकसेवक पर्यवेक्षिका विद्या सोनवणे ह्या भोर येथे एकाच कार्यालयात काम करत असून, त्यांच्या कार्यालयाच्या झालेल्या ऑडीटच्या अनुषंगाने ऑडीटर यांना देण्यासाठी पर्यवेक्षिका सोनवणे यांनी ४,०००/- रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. सदर तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक पर्यवेक्षिका विद्या सोनवणे यांनी ४,०००/- रुपये लाचेची मागणी करुन आज दिनाक १७/०१/२०२३ रोजी ती लाच रक्कम स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून वरिलप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

विद्या गजानन सोनवणे (वय- ४९) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पर्यवेक्षिकेचे नाव आहे. याबाबत ५४ वर्षाच्या महिलेने १३ जानेवारी रोजी पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार महिला या विद्या सोनवणे यांच्या कार्यालयात काम करतात. विद्या सोनवणे यांनी तक्रारदार यांच्याकडे कार्यालयाचे झालेल्या ऑडिच्या अनुषंगाने ऑडिटर यांना देण्यासाठी चार हजार रुपये लाच मागितली. याबाबत महिलेने पुणे एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता विद्या सोनवणे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना सोनवणे यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे
पोलीस अंमलदार मुकुंद अयाचित. सरिता वेताळ, चालक जाधव यांच्या पथकाने केली.

शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

२. ई-मेल आयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in –

३. ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *