मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातील दुकानांना आग;

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे :  |थोडक्यात जुना बाजार आगीची माहिती…

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

मंगळवार पेठेतील जुना बाजार येथील दुकानांना बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत ८ ते १० दुकाने जळून भस्मसात झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

मंगळवार पेठ, जुना बाजार येथे सकाळी ०७•३८ वाजता पञा व लोखंडी शेड असलेले दुमजली अंदाजे ०८ ते १० दुकाने होती. सदर दुकानांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती.

जुन्या बाजारात फर्निचर, लोखंडी साहित्य, दुचाकीचे सुटे भाग विक्री करणारी दुकाने आहेत. त्यातील एका दुकानात सकाळी साडेसात वाजता आग लागली.

अग्निशमन दलाला सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी वर्दी मिळाली. तातडीने ८ अग्निशमन वाहने (फायरगाडी व वॉटर टँकर) घटनास्थळी दाखल झाली.घटनास्थळी धूर मोठ्या प्रमाणात होता.दुकानात मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल व इतर साहित्य जास्त प्रमाणात होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख विजय भिलारे आणि जवानांनी पाण्याचा मारा करुन सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी आग आटोक्यात आणली. सध्या तेथे कुलिंगचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

या आगीत लाकडी साहित्य, प्लास्टिक माल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल व इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले.

Web Title :-  Pune Fire News | Fire to shops in old bazaar in Mangal Peth; shops gutted in fire

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *