खडक पोलीस स्टेशनची कामगिरी.कोयता गँग मधिल आरोपींच्या चोवीस तासांत आवळल्या मुसक्या.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. 

कोयता गँग विरोधात खडक पोलीस स्टेशन अ‍ॅक्शन मोडमध्ये,

दिनांक १६/०१/२०२३.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

जिवघेणा हल्ला करणाऱ्या कोयता गँग मधिल आरोपींच्या चोवीस तासांत आवळल्या मुसक्या.

मागील काही दिसांपासून पुणे शहर आणि परिसरात कोयता गँगने दहशत माजवली आहे.पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

ऐन संक्रातीच्या दिवशी भवानी पेठ येथील राहणाऱ्या एका तरुणावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या कोयता गैंग मधिल आरोपीना खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडुन २४ तासाचे आत अटक करण्यात आले आहे.

सदरबाबत अधिक माहीती अशी की, फिर्यादी नामे प्रेम अनिल पाटोळे वय २६ वर्षे, व्यवसाय रिक्षा चालक, रा.४११, भिमाले संकुल पिंपळमळा, कासेवाडी पुणे यास त्याची पार्क केलेली मोटार सायकल पाडल्यावरुन तिन महीन्यापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी नामे १) अनिकेत व्यकंटेश कोळी २) शैलेश उर्फ साहील रामप्पा बॅगरी ३) अजय रामप्पा बॅगरी वय ४) भरत व्यंकटेश कोळी यांनी कोयत्याने हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक २३/२०२३ कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४ भादवि सह मपोका कायदा कलम ३७ (१) १३५ सह आर्म अॅक्ट कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने श्रीमती संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी त्याबाबत तात्काळ दखल घेवुन श्री.राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस स्टेशन पुणे यांचेमार्फत तात्काळ दोन तपास पथके तयार केली व त्यांना तपासाबाबत सुचना दिल्या. नेमण्यात आलेल्या तपास पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत वेगाने तपास केल्याने गंभीर गुन्हयातील आरोपींना २४ तासांचे आत अटक करण्यात यश आले आहे.

नमुद कारवाई श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व श्री. सतिश गोवेकर, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीमती संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेश तटकरे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. राकेश जाधव सहा. पोलीस निरीक्षक, श्री. अतुल बनकर, पोलीस उप निरीक्षक, श्री. आकाश विटे, पोलीस उप निरिक्षक, व पोलीस अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, अक्षयकुमार बाबळे, नितीन जाधव, महेश पवार, महेश जाधव, योगेश चंदेल यांचे पथकाने केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *