राजकीय कार्यक्रमांमध्ये पाकीटमार चोरांची टोळी गुन्हे शाखा वागळे युनिट ५ ठाणे कडुन जेरबंद .
मुंबई ठाणे पोलिसांची बातम्या:
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
पोलीस महारा गुन्हे शाखा घटक ५ वागळे इस्टेट , ठाणे शहर .
मुंबई ठाणे पोलिसांची बातम्या:दिनांक : -१९ / ०८ / २०२१
राजकीय कार्यक्रमांमध्ये पाकीटमार चोरांची टोळी गुन्हे शाखा वागळे युनिट ५ ठाणे कडुन जेरबंद .
एकुण सुमारे रु . ६,६९ , ००० / – रूपये किंमतीचा मुद्देमाल नमुद आरोपीताकडुन जप्त
ठाणे पोलीस आयुक्तालयात राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी नागरीकांचे खिसे कापुन पैसे व मोबाईल फोन चोरी केलेल्या घटना घडल्या होत्या . सदर घटनांचे अनुषंगाने कोपरी पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . सदर गुन्हयाचा समांतर तपास युनिट ५ गुन्हे शाखा ठाणे करीत होती . दिनांक १९ / ०८ / २०२१ रोजी सपोनि श्री भुषण शिंदे युनिट ५ , वागळे इस्टेट यांना बातमीदारामार्फत सदर गुन्हयातील संशयीत आरोपींबाबत माहिती प्राप्त झाली . सदर माहितीचे आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयीत आरोपीत हे शिळफाटा पनवेल रोडवरील दहिसर मोरी येथील कल्पवृक्ष हॉटेल जवळ येणार असल्याची खात्री झाल्याने , युनीट ५ , वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन खालील आरोपीत यांना १२:३० वाजता ताब्यात घेण्यात आले आहे .
१ ) अबुबकर उर्फ अबु कबुतर मो . उस्मान अन्सारी , वय ३५ वर्षे , राह – मालदा शिवार , मालेगाव , नाशिक २ ) नदीत अक्तर फैयाज अन्सारी , वय ३० वर्षे , राह- आयेशानगर , मालेगाव , नाशिक ३ ) आतिक अहमद मो . स्वराती अन्सारी , वय ५१ वर्षे , राह- रमजानपुरा , मालेगाव , नाशिक ४ ) अश्पाक अहमद अन्सारी , वय ३८ वर्षे , राह- दत्तनगर , मालेगाव , नाशिक
सदर आरोपींकडे कसुन चौकशी केल्यावर त्यांनी राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी नागरिकांचे खिसे कापुन रोख रक्कम व मोबाईल फोन चोरी केल्याचे कबुल केले . त्यांचेकडुन चोरीतील एकूण १,१९ , ००० / – रोख रक्कम , १० मोबाईल फोन तसेच एक पांढ – या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची सेलेरीओ चारचाकी गाडी व खिसे कापण्यासाठी वापरलेले कटर असा एकुण सुमारे रु . ६,६९ , ००० / – रूपये किंमतीचा मुद्देमाल नमुद आरोपीताकडुन जप्त करण्यात आला आहे .
सदर आरोपीतांना पुढील कारवाईकरीता कोपरी पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे . सदर आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन यांचेविरूध्द मालेगाव पो.स्टे . , संगमनेर पो.स्टे . , सटाना पो.स्टे . , भद्रकाली पो . स्टे . , एम . एफ . सी . पो . स्टे . , वाशी पोलीस स्टेशन येथे अशा प्रकारचे साधारण १२ गुन्हे दाखल आसल्याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे .
सदरची कारवाई गुन्हे शाखा वागळे युनिट -५ , ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . विकास घोडके साो , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरूण क्षिरसागर , सहा.पो.निरी . भुषण शिंदे , सहा.पो.निरिक्षक अनिल सुरवसे , पोउपनिरि . बाबु चव्हाण , स.फौ. शरद तावडे , स.फौ. सुनिल अहिरे , स.फौ. देविदास जाधव , स.फौ. विजयकुमार गो – हे , पो.हवा . जगदीश व्हावळदे , पो.हवा . दिलीप शिंदे , पो.हवा . शिवाजी रायसिंग , पो.हवा.अजय फराटे , पो.हवा.राजेंद्र गायकवाड , पो.हवा . मनोज पवार , पो . हवा . अजित शिंदे , पो.ना. रघुनाथ गार्डे , पो.कॉ. सागर सुरळकर , चालक यश यादव , म.पो.कॉ. सुजाता शेलार . तांत्रिक विश्लेषण तज्ञ मोहन भानुशाली या पथकाने केली आहे .
यापुर्वी दाखल असलेले गुन्हे १ ) अबुबकर उर्फ अबु कबुतर मो . उस्मान अन्सारी , वय ३५ वर्षे , राह . मालदा शिवार , मालेगाव , नाशिक . १ ) आझादनगर पोलीस स्टेशन , गु . रजि.नं. २८/२०१४ भा.द.वि. ३२४ , ३२३,५०४,३४ २ ) आझादनगर पोलीस स्टेशन , गु . रजि.नं. ८५/२०१४ भा.द.वि. ३०२ , ३४ ३ ) आझादनगर पोलीस स्टेशन , गु . रजि.नं. १ ९ ६ / २०११ भा.द.वि. ४३९ , ३९ ७,३९५४ ) धुळे तालुका पोलीस स्टेशन गु . रजि . नं . ४६/२०१२ भा.द.वि. ३९९ , ४०२ . ५ ) मालेगाव शहर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. २३/२०२० भा.द.वि. ३२४ , ३२३,५०४,३४ ६ ) सटाणा पोलीस स्टेशन , गु . रजि . नं . १९३ / २०१६ भा.द.वि. ३७९ . ७ ) भद्रकाली पोलीस स्टेशन , १ गुन्हा . ८ ) संगमनेर पोलीस स्टेशन , १ गुन्हा . २ ) नदीत अक्तर फैयाज अन्सारी , वय ३० वर्षे , राह.आयेशानगर , मालेगाव , नाशिक . १ ) आझादनगर पोलीस स्टेशन , मालेगाव- २ गुन्हे . २ ) मनमाड पोलीस स्टेशन , नाशिक ग्रामिण -१ ३ ) आतिक अहमद मो . स्वराती अन्सारी , वय ५१ वर्षे , राह- रमजानपुरा , मालेगाव , नाशिक १ ) डायघर पोलीस स्टेशन १ गुन्हा .
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526