वाहनचोरी विरोधी पथक-२ कामगिरी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करून दहशत निर्माण करणारा आरोपीला अटक.
वाहनचोरी विरोधी पथक-२ कामगिरी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करून दहशत निर्माण करणारा आरोपीला अटक.
ACS POLICE CRIME SQUAD
आज रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2, कडील सहा.पोलीस निरीक्षक विवेक पाडवी,पो.हवा २६३४ राजेश अभंगे ,पो ना ६४६९ शिवाजी जाधव ,पो.ना. ५५खरपुडे, पो शि८६६६ अमोल सरतापे असे पुणे शहर वानवडी, हडपसर , लोणी काळभोर पो. स्टे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक शिवाजी जाधव यांस बातमीदाराकडून माहिती मिळाली की,एक इसम काळेपडळ नविन सासवड रोड रेल्वे स्टेशन पुणे येथे धारदार हत्यार कमरेला लावून संशयितरित्या थांबला आहे. सदरचे माहितीवरून त्यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रतिक महेंद्र वाघोदे वय २१ रा. धनराज हाइट्स,समता स्कुलजवळ उरुळी देवाची पुणे असा असल्याचे सांगितले त्याचीअंगझडती घेता त्याच्याकडे एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर हडपसर पो.स्टे येथे भारतीय हत्यार कायदा ४ (२५) मपोका ३७(१) सह १३५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे .
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526